JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO : विमानात उस्फूर्त नृत्य करून एअर होस्टेसनी दिला प्रवाशांना सुखद धक्का

VIDEO : विमानात उस्फूर्त नृत्य करून एअर होस्टेसनी दिला प्रवाशांना सुखद धक्का

हैदराबादहून मुंबईकडे येणाऱ्या जेट एअरवेजच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना एअर होस्टेस नेहमीच्या सुरक्षाविषय सूचना देण्यासाठी उभ्या राहिल्या त्या वेळी एक सुखद धक्का बसला. बातुकम्मा या पारंपरिक तेलुगू गीतावर एअर होस्टेसनी नृत्य सुरू केलं आणि…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विमान प्रवासाच्या सुरुवातीला एअरहोस्टेस सुरक्षाविषयक सूचना देतात. नेहमी प्रवास करणाऱ्यांना त्यात काही विशेष वाटत नाही. त्याकडे दुर्लक्षच केलं जातं. पण रविवारी मात्र हैदराबादहून मुंबईकडे येणाऱ्या जेट एअरवेजच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना या सूचनांच्या वेळी एक सुखद धक्का बसला. तेलंगणात ९ ते १७ ऑक्टोबरदरम्यान पारंपरिक बातुकम्मा उत्सव साजरा झाला. या ९ दिवसांच्या उत्सवात बातुकम्मा पारंपरिक गाणं गायलं जातं. एअर होस्टेसनी या पारंपरिक गाण्यावर उस्फूर्तपणे नाचायला सुरुवात केली आणि विमानातल्या प्रवाशांना हा एक वेगळा अनुभव मिळाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या