जम्मू काश्मीर, 26 ऑगस्ट : गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या वृत्तानंतर जम्मू-काश्मीर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे जुने आणि जाणते जेष्ठ नेते आज काँग्रेस सोडून बाहेर पडत आहेत. यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गुलाम नबी आझाद यांच्यात काही कारणांवरून वादाचे प्रसंग ओढवले होते. त्यामुळे गुलाम नबी आझाद काहीसे नाराज देखील असल्याचं समजत आहे. दरम्यान गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू-काश्मीर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसच्या 5 आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आझाद यांनी नवीन पक्ष स्थापन केला तर त्यांच्यासोबत जाणार, अशी भूमिका माजी आमदारांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीबाबत भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. “राहुल गांधींनी पंतप्रधानांचा अध्यादेश फाडणं म्हणजे ‘बालिशपणा’”; गुलाम नबी आझाद यांनी सांगितली राजीनाम्याची कारणं काँग्रेसनं आज जुना आणि जाणता चेहरा गमवला. काँग्रेसची गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली पडझड असो किंवा अंतर्गत कलह असो वारंवार त्यांनी पत्राद्वारे सोनिया गांधी यांना सांगितलं होतं. काँग्रेसला एक कायम स्वरुपी अध्यक्ष असावा, संघटनेला बळ द्यावं असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले. मात्र त्यांच्या या मुद्द्यांची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली नाही. दुसऱ्या कुठल्याही पक्षात ते जाणार का? याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाकडून आता त्यांची समजून काढली जाणार का? त्यांना पुन्हा बोलावलं जाणार का? त्यांची मनधरणी कशी करणार याकडे लक्ष लागलं आहे.