JOIN US
मराठी बातम्या / देश / ऑपरेशनवेळी एक-दोन नाही, पोटातून काढले तब्बल 639 लोखंडी खिळे; या प्रकाराने डॉक्टरही हैराण

ऑपरेशनवेळी एक-दोन नाही, पोटातून काढले तब्बल 639 लोखंडी खिळे; या प्रकाराने डॉक्टरही हैराण

एका व्यक्तीला पोटदुखीच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या व्यक्तीच्या पोटात अतिशय असल्याने डॉक्टरांनी पोटाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, आणि शस्त्रक्रियेवेळी जे दिसलं त्याने डॉक्टर हैराण झाले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : एखाद्याला लागलं, खरचटलं किंवा अगदी लोखंडाचा खिळा टोचला तरी अतिशय त्रास होतो. डॉक्टरांकडे जावून त्यावर इंजेक्शन किंवा काही उपचार घ्यावे लागतात. पण एका व्यक्तीच्या पोटातून चक्क एक-दोन नाही, तर तब्बल शेकडो खिळे (Iron Nail) निघाल्याची घटना घडली आहे. डॉक्टरही या घटनेने हैराण आहेत. पोटातून हे खिळे बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना मॅग्नेट (Magnet) अर्थात लोहचुंबकाची मदत घ्यावी लागली. हा प्रकार पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये (Kolkata Medical College) एका व्यक्तीला पोटदुखीच्या तक्रारीमुळे दाखल करण्यात आलं. त्या व्यक्तीच्या पोटात अतिशय दुखत होतं. डॉक्टरांनी पोटाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, आणि शस्त्रक्रियेवेळी जे दिसलं त्याने डॉक्टर हैराण झाले. त्या व्यक्तीच्या पोटातून तब्बल 639 लोखंडाचे खिळे बाहेर काढण्यात आले. कोलकाताच्या मेडिकल कॉलेजच्या सर्जरी विभागात दिड तासांपर्यंत सर्जरी करून संपूर्ण लोखंडी खिळे बाहेर काढण्यात आले.

(वाचा -  शेतीचा म्युजिकल फंडा, शेतात लावतो गाणी, पिकं येता भारी! )

48 वर्षीय गोबरडांगा (Goberdanga) येथे राहणारे प्रदीप ढाली काव (Pradeep Dhali kaav) असं या व्यक्तीचं नाव आहे. शस्त्रक्रियेनंतर या व्यक्तीची तब्येत स्थिर आहे. तसंच त्याच्या पोटातील आतडेही सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात खिळे बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना लोहचुंबकाची मदत घ्यावी लागली.

(वाचा -  कारच्या सेफ्टी फीचर्समधील Dual Airbag बद्दल सरकार घेणार मोठा निर्णय )

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती डिप्रेशनमध्ये माती खायचा, मातीसोबत त्यातील खिळेही खात होता. त्याच्या कुटुंबियांनीही तो कधी-कधी माती खात असल्याचं सांगितलं. त्याला विरोध केल्यानंतरही तो माती खात असल्याचं कुटुंबियांनी म्हटलंय.

(वाचा -  आधी 3 मिनिटांत एक इनोवा बनत होती, आता 2.5 मिनिटांचं टार्गेट; कर्मचारी संपावर )

परंतु तो मातीसोबत खिळेही खात असल्याची कोणालाच कल्पना नव्हती. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी इतक्या मोठ्या प्रमाणात पोटातून खिळे काढल्याचं सांगितल्यानंतर याबाबत कुटुंबियांना माहिती मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या