JOIN US
मराठी बातम्या / देश / केंद्राचं दहशतवादाविरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण; 24 तासात मारले गेले 4 दहशतवादी

केंद्राचं दहशतवादाविरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण; 24 तासात मारले गेले 4 दहशतवादी

केंद्र सरकार सध्या सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीविरुद्ध “झिरो टॉलरन्स” धोरण (Zero Tolerance Policy) पुढे आणत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “समृद्ध आणि शांततापूर्ण J&K” च्या दृष्टीकोनाची पूर्तता करण्यासाठी हे आवश्यक असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर 08 जून : सीमापार वाढलेल्या ड्रोन अॅक्टिव्हिटी आणि स्टिकी बॉम्बच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी उच्चस्तरीय बैठक घेतली. यानंतर आता गेल्या 24 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे (Four terrorists killed in Jammu and Kashmir) . ठार झालेल्यांपैकी तीन जण पाकिस्तानी होते, तर चौथ्याची ओळख पटली नाही, असं पोलिसांनी सांगितलं. केंद्र सरकार सध्या सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीविरुद्ध “झिरो टॉलरन्स” धोरण (Zero Tolerance Policy) पुढे आणत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “समृद्ध आणि शांततापूर्ण J&K” च्या दृष्टीकोनाची पूर्तता करण्यासाठी हे आवश्यक असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. पैगंबरांबाबतच्या वक्तव्याचा वाद; अलकायदाची मुंबईसह या महत्त्वाच्या शहरांत आत्मघाती हल्ल्यांची धमकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी एकाचवेळी कारवाई करत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. AK-56, ग्रेनेड आणि दारूगोळा यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत, असं पोलिसांनी सांगितलं. काश्मीर खोऱ्यात यंदाच्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेच्या तयारीत शाह यांनी १५ दिवसांत किमान दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या आहेत. ड्रोन आणि स्टिकी बॉम्बसारख्या नवीन सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी सशस्त्र दलांद्वारे तंत्रज्ञानाचा अधिक चांगला वापर करणं हा मंगळवारच्या बैठकीचा मुख्य अजेंडा होता. राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक! सुरक्षा ताफ्यातीन दोन वाहने वाट चुकली अन्.. गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक देखील घेण्यात आली. यात राष्ट्रीय तपास संस्था, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांशी संवाद साधला. त्यांनी देखील दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर चर्चा केली. आठवड्याच्या सुरुवातीला शाह यांनी डोभाल आणि रॉ प्रमुख समनत गोयल यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यांनी केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा केली होती. शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि कोविड-19 साथीच्या आजारामुळे दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर होणाऱ्या वार्षिक अमरनाथ यात्रेच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी 3 जून रोजी एक उच्चस्तरीय बैठकही बोलावली होती. .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या