JOIN US
मराठी बातम्या / देश / पाकिस्तान युद्धात या War Hero ने उडवलं होतं कराची बंदर; 1971 युद्धाचे हीरो गोपाल राव कालवश

पाकिस्तान युद्धात या War Hero ने उडवलं होतं कराची बंदर; 1971 युद्धाचे हीरो गोपाल राव कालवश

1971 च्या भारत-पाकिस्तान (India Pakistan war) युद्धातील ‘वॉर हिरो’ (War Hero) आणि महावीर चक्र देऊन सन्मान करण्यात आलेले गोपाल राव (Gopal Rao) यांचं चेन्नईत निधन झालं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 9 ऑगस्ट : 1971 च्या भारत-पाकिस्तान (India Pakistan war) युद्धातील ‘वॉर हिरो’ (War Hero) आणि महावीर चक्र देऊन सन्मान करण्यात आलेले गोपाल राव (Gopal Rao) यांचं चेन्नईत निधन झालं. ते 94 वर्षांचे (94 years) होते. कमोडोरे कासरगोड पटनाशेट्टी गोपाल राव एमव्हीसी व्हीएसएम असं त्यांचं पूर्ण नाव. 1971 च्या ऐतिहासिक विजयाला (1971 war) नुकतीच 50 वर्ष पूर्ण झाली. विजयाच्या या सुवर्णमहोत्सवी नुकताच त्यांचा भारत सरकारकडून विशेष सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. 1971 च्या युद्धातील कामगिरी 13 नोव्हेंबर 1926 ला जन्मलेल्या गोपाळ राव यांचं सर्वोच्च कर्तृत्व दिसलं ते पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन ट्रायडंटच्या वेळी. ती रात्री होती 4 डिसेंबर 1971 ची. भारताच्या समुद्री हद्दीतून पाकिस्तानमधील कराचीपर्यंत पोहोचून तिथं बॉम्बस्फोट घडवून पोर्ट उदधवस्त करण्याची धाडसी कामगिरी राव यांनी आखली होती. त्यासाठी त्यांना पाकिस्तानकडून होणाऱ्या विविध प्रकारच्या हल्ल्यांना तोंड द्यावं लागणार होतं. पाकिस्तानकडून समुद्रातील युद्धनौकांकडून होणारे हल्ले आणि त्याचवेळी हवाई मार्गे होणारे हल्ले यातील कशाचीही पर्वा न करता राव यांनी पाकिस्तानच्या कराची बंदरापर्यंत धडक देण्याची योजना आखली आणि ती सफल करून दाखवली. टास्क फोर्सचं नेतृत्व करत ते कराची बंदरावर पोहोचले आणि तिथं त्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात मोठं यश मिळवलं. बांग्लादेश निर्मितीतील ही एक अत्यंत महत्त्वाची घटना होती. या हल्ल्यात राव यांनी दोन युद्धनौका आणि एक पाकिस्तानी विनाशिका स्फोटाने उडवण्यात यश मिळवलं. त्यामुळे पाकिस्तानकडून भारताला असणारा संभाव्य धोका टळला आणि पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यापूर्वी भारताने ही कारवाई केल्यामुळे पाकिस्तानला केवळ बघ्याची भूमिका घेण्यापलिकडे काहीही पर्याय उरला नाही. हे वाचा - 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास होणार सुरू; होऊ नका Coronaचे वाहक, अशी घ्या काळजी गोपाल राव यांच्या या कार्याचा भारत सरकारतर्फे महावीर चक्र देऊन गौरव करण्यात आला होता. त्याचप्रमाणं वीर सेवा पदक देऊनही त्यांना गौरवण्यात आलं होतं. राव यांच्या पाठीमागे एक मुलगा, दोन मुली आणि त्यांची कुटुंबं असा परिवार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या