08 ऑगस्ट : कौटुंबिक अडचणींमुळे राज्यसभेत आपण हजर राहू शकलो नाही, आपल्या भावाची बायपास सर्जरी झाल्यानं आपल्याला घरी राहणं गरजेचं होतं असा खुलासा आता सचिन तेंडुलकरने केलाय.
कोणत्याही घटनात्मक संस्थेचा अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता असं स्पष्टीकरणही सचिननं दिलंय. तसंच माझ्या गैरहजेरीची खूपच चर्चा झाली असा टोला सचिननं मीडियाला लगावला.
खासदार सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा राज्यसभेत गैरहजेरीवरुन वादंग निर्माण झाला. खासदार झाल्यापासून सचिनने फक्त 3 दिवस तर रेखानं फक्त 5 दिवस राज्यसभेत हजेरी लावली. यावरुन आज सभागृहातंही खासदारांनी नाराजी व्यक्त केली. तर मीडियानंही हा मुद्दा चांगलाच धरून ठेवला.
पण संपूर्ण दिवसभर सचिननं या संदर्भात प्रतिक्रीया दिली नव्हती. कॉमनवेल्थ विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी आज केंद्र सरकारने विग्यान भवनमध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यासाठी सचिनची प्रमुख उपस्थिती होती.पण या कार्यक्रमाअगोदर सचिनला पत्रकारांनी प्रश्न विचारले. पण काहीही उत्तर न देता सचिन तिथून निघून गेला. पण अखेर सचिनला खुलासा करणं भाग पडलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++