JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / PM नरेंद्र मोदींच्या ताफ्यात सामील झाली ही 12 कोटींची कार, पाहा PHOTOS

PM नरेंद्र मोदींच्या ताफ्यात सामील झाली ही 12 कोटींची कार, पाहा PHOTOS

Mercedes-Maybach ने गेल्या वर्षी भारतात S600 Guard ला 10.5 कोटी रुपयांना लॉन्च केलं होतं. S650 ची किंमत 12 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. आता ही प्रसिद्ध कार देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी स्विकारणार आहे. कारण आता या कारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलं आहे. पाहा PHOTOS

0105

शक्तिशाली मर्सिडीज-मेबॅच एस 650 कारने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात स्थान मिळवलं आहे. कारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात ही कार पहिल्यांदा हैदराबाद हाऊसमध्ये दिसली होती. जेव्हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर आले होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात मेबॅक एस 650 पहिल्यांदा दिसली होती.

जाहिरात
0205

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. कारण या कारमध्ये SPG सुरक्षेसह इतर आवश्यक सगळ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात
0305

याआधी पंतप्रधानांच्या ताफ्यात BMW 7 सीरीजची बुलेटप्रूफ कार होती. रेंज रोव्हर सेंटिनेल पूर्णपणे बुलेटप्रुफ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील या वाहनात अनेक बदल करण्यात आले आहेत. कारमध्ये 5.0 लीटर V8 इंजिन आहे जे 375bhp सह येते. हे वाहन 0 ते 100 चा वेग अवघ्या 10 सेकंदात पकडते. त्याची किंमत 2 ते 4 कोटींच्या दरम्यान आहे.

जाहिरात
0405

टोयोटा फॉर्च्युनरही अशीच शक्तीशाली कार आहे. जी मोदींच्या ताफ्यात आधीच आहे. ही कार एखाद्या टाकीसारखी दिसते. ही कार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरली जाते. या वाहनात विशेष प्रकारचे अँटेना बसवण्यात आले आहेत. या अँटेनाच्या सहाय्याने सुरक्षा मिळते. आणि उपग्रहांच्या मदतीने त्याचा मागोवा ही घेता येतो.

जाहिरात
0505

टोयोटा लँड क्रूझर ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील अजून एक कार आहे, परंतु ती फक्त अधूनमधून वापरली जाते. टोयोटा लँड क्रूझर देखील अनेक आधुनिक वैशिष्ट्यांसह येते. टोयोटाच्या या शक्तिशाली वाहनाला V8 इंजिन देण्यात आले आहे जे 260bhp पॉवर देते. या वाहनाची सुरुवातीची किंमत 1.47 कोटी रुपये आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या