JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / नाशकात पुराच्या पाण्यात तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

नाशकात पुराच्या पाण्यात तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

नाशकातील पुरस्थितीमुळे रामकुंडावर पोहणाऱ्यांची गर्दी (Youth swimming in flood water at ramkund) वाढली आहे. याठिकाणी काही तरुण उंचावरून उड्या मारत जीवघेणी स्टंटबाजी ( Suicidal stunts in flood water) करत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 29 सप्टेंबर: बंगालच्या उपसागरात निर्णाम झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे (Cyclone Gulab) मागील दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) झोडपून काढलं आहे. त्यामुळे अनेक नद्या आणि धरणं ओसंडून वाहू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातही अतीवृष्टीमुळे पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशकातील रामकुंडावर येथे नदी दुथडी भरून वाहत आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करताच रामकुंडावर पोहणाऱ्यांची गर्दी (Youth swimming in flood water at ramkund) वाढली आहे. याठिकाणी काही तरुण उंचावरून उड्या मारत जीवघेणी स्टंटबाजी ( Suicidal stunts in flood water) करत आहे. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Viral video) होतं आहे. खरंतर, गेल्या काही तासांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे गंगापूर धरण काठोकाठ भरलं आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून 3 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच नदीच्या काठावरील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. असं असताना काही तरुण मात्र रामकुंडावर पोहण्यासाठी पोहोचले आहेत. ते उंच इमारतीवरून नदीत जीवघेणी स्टंटबाजी करत आहेत. प्रशासनाचे कर्मचारी याकडे कानाडोळा करताना दिसत आहे.  तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे.

संबंधित बातम्या

गेल्या काही तासांपासून जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे गंगापूर, दारणा, नांदूर-मध्यमेश्वर या सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 15 हजार क्यूसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून 25 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. परिणामी नदी काठच्या 220 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत पाण्यानं गाठली धोक्याची पातळी गाठली आहे. हेही वाचा- पोहण्याचे धाडस अंगलट; पुराच्या पाण्यात गेला वाहून, नाशकातील घटनेचा LIVE VIDEO त्याचबरोबर दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहचलं आहे. तर पटांगण भाजी मंडई पूर्णपणे पाण्याखाली जाऊन सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी पात्रातील सर्व पुरातन मंदीरं आणि कुंभस्थान देखील पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे नदीतील पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या