JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / VIDEO: नाशिकमध्ये पोलिसांचं रौद्ररूप, विनाकारण फिरणाऱ्यांना दिला असा 'प्रसाद'

VIDEO: नाशिकमध्ये पोलिसांचं रौद्ररूप, विनाकारण फिरणाऱ्यांना दिला असा 'प्रसाद'

नाशिक जिल्ह्यात प्रशासनानं आता धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला आहे. पाहा VIDEO

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 21 मे: राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. नाशिकमध्येही (Nashik) कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तसंच नाशिकमध्ये कोरोनासह म्युकरमायकोसिसचे रुग्णही मोठ्या झपाट्याने वाढताना दिसताहेत. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसनं (Mucormycosis) 8 बळी घेतलेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोना आणि म्युकरमायकोसिस सारख्या आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनानं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात प्रशासनानं आता धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला असून धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. नाशिकमध्ये लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर पोलीस आक्रमक झालेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिस कडक कारवाई करत आहेत. या कारवाईचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये पोलीस आक्रमक झालेले दिसत आहेत.

तसंच विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिस दंडुकाचा प्रसादच देत आहे. भद्रकाली आणि पंचवटी भागात पोलीस आक्रमक होताना पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनी खुली दुकानं, ग्राहक आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. हेही वाचा-  P-305 बार्ज दुर्घटना प्रकरण, 49 जणांच्या मृत्यू प्रकरणात कॅप्टनवर गुन्हा दाखल नाशिक जिल्हा एकीकडे कोरोनाचा सामना करत असताना जिल्ह्यात म्युकरमायकोसिस सारख्या आजारानं डोकंवर काढलं आहे. म्युकरमायकोसिसचे 8 बळी गेल्यानं जिल्हा पुन्हा हादरला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या