जर्मनीमध्ये प्रत्येक व्यक्ती सरासरी 130 लिटर पाण्याच्या वापर करतो. मात्र एका व्यक्तीच्या वापरासाठी उत्पादीत होणाऱ्या वस्तूंचा विचर करता 4,000 लिटर पाणी प्रत्येक व्यक्तीला लागतं ज्याला व्हर्चुअल वॉटर म्हणतात.
नाशिक, 21 मे : नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मनपाच्या मुकणे आणि गंगापूर धरणाला वीजपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरचा वीजपुरवठा पावसापूर्व कामांसाठी खंडित करण्यात येणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बंद ठेवण्याचा निर्णय मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा हा शनिवारी बंद राहणार आहे. तर रविवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होणार आहे. नाशिक शहरातील पावसाळा पूर्व कामामुळे 22 मेला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यानं नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे अस आवाहन पाणीपुरवठा विभागाचे वतीने करण्यात आलं आहे. गंगापूर धरणावरील महापालिकेच्या पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलसाठी महावितरणाच्या 132 केव्ही सातपूर आणि 132 केव्ही महिंद्रा या दोन एक्सप्रेस फिडर वरून 33 केव्ही करण्यात येतो. तसेच मुकणे धरण पंपिंग स्टेशनला गोंदे येथून महावितरण कंपनीच्या रेमंड सबस्टेशन वरून 33 केव्ही वीजपुरवठा करण्यात येतो. या दोन्ही फिडर ओव्हरहेड लाईनच्या पावसाळा पूर्व कामांमुळे पाणीपुरवठा आणि शनिवारी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा होणार नाही. हे ही वाचा- मोठी बातमी! कोरोनानंतर नाशिक Mucormycosis चा हॉटस्पॉट, 8 बळी तर 166 जण बाधित यामुळे नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून ठेवावे असं आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मनपाच्या मुकणे आणि गंगापूर धरणाला वीजपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरचा वीजपुरवठा पावसापूर्व कामांसाठी खंडित करण्यात येणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बंद ठेवण्याचा निर्णय मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा हा शनिवारी बंद राहणार आहे. तर रविवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होणार आहे. नाशिक शहरातील पावसाळापूर्व कामामुळे 22 मेला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मनपाच्या मुकणे आणि गंगापूर धरणाला वीजपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरचा वीजपुरवठा पावसापूर्व कामांसाठी खंडित करण्यात येणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बंद ठेवण्याचा निर्णय मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात आलाय. यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा हा शनिवारी बंद राहणार आहे तर रविवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होणार आहे. नाशिक शहरातील पावसाळा पूर्व कामामुळे 22 मेला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.