JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / मी जबाबदार ध्वनी प्रदूषणाला, आता मी कायदा करणार; कर्कश आवाज चालणार नाही: नितीन गडकरी

मी जबाबदार ध्वनी प्रदूषणाला, आता मी कायदा करणार; कर्कश आवाज चालणार नाही: नितीन गडकरी

नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) शनिवारी नाशिकमध्ये (Nashik) होते.

जाहिरात

'मी दोन तीन वेळा बैठक घेतली पण वाद काही मिटला नाही. त्यानंतर राज्या-राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीला बोलावलं'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 04 ऑक्टोबर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) शनिवारी नाशिकमध्ये (Nashik) होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या. यावेळी नितीन गडकरींच्या हस्ते थीम पार्कचं (theme park) उद्घाटन (inaugurated) करण्यात आलं. कार्यक्रमा दरम्यान बोलताना त्यांनी सर्व ध्वनी प्रदूषणाला मी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी सर्व ध्वनी प्रदूषणला मी जबाबदार आहे. त्यामुळे गाड्यांवरील लाल दिवे मी बंद केले. त्यामुळे माझ्यावर बरेच जण नाराज देखील आहेत, अशी मिश्किल टिपण्णी गडकरींनी केली. तसंच मी आता कायदा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

मी आता कायदा करणार आहे. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू कोणतीही कार असो कर्कश आवाज चालणार नाही. सर्व भारतीय वाद्ये हवीत. अॅम्बुलन्स पोलिसांचेही कर्कश आवाजही चालणार नाहीत. असेही गडकरी म्हणाले. हेही वाचा-  End Of Work From Home: भारतातील ‘या’ मोठ्या कंपन्या लवकरच बंद करणार वर्क फ्रॉम होम; बघा संपूर्ण लिस्ट

 गोदावरी सुंदर आहे. हवामान मस्त आहे. नाशिक ग्रीन आणि सुंदर असंच रहावे असं म्हणत महापौर आणि महापालिका आयुक्तांनी अभ्यास करावा. 5 वर्षात ध्वनी, जल आणि वायू प्रदूषण मुक्त नागपूर करणार असल्याचं ठरवलं असल्याचंही ते यावेळी म्हणालेत.

हेही वाचा-  Maharashtra School Reopen: तब्बल दीड वर्षानं आज वाजणार शाळेची पहिली घंटा, हे आहेत महत्त्वाचे नियम

आपल्याला प्रदूषण मुक्त हवा मिळाली तर डॉक्टरची गरज भासणार नाही. शुद्ध हवेसाठी अशा उद्यानाची गरज आहे, असा सल्लाही गडकरींनी नाशिककरांना दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या