प्रातिनिधिक फोटो
नाशिक, 02 नोव्हेंबर: मागील तीन-चार वर्षांत नाशिक शहरात आणि आसपासच्या परिसरात सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अखेर नाशिक शहरातील गंगापूर पोलिसांनी अट्टल सोन साखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या (2 Accused arrested) आहेत. सोनसाखळी हिसकावण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. संबंधित दोघा आरोपींनी गेल्या काही काळात पाच, दहा नव्हे तर तब्बल 56 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्या दोन्ही साखळी चोरांमध्ये एक तरुण हा उच्च शिक्षित असून तो सिव्हिल इंजिनिअर (civil engineer became chain snatcher) आहे. इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आरोपी तरुणाने साखळी चोरीची भलताच बिझनेस सुरू केला होता. मागील तीन वर्षात चेन स्नॅचिंग करत आरोपी अल्पवधीतच लखपती झाला होता. पोलिसांनी दोघांकडून 71 तोळे सोनं आणि अडीच लाखांची रोकड असा एकूण 29 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हेही वाचा- पोत्यात आढळला महिलेचा मृतदेह; अंगातील गाऊन अन् पायातील दोरा उलगडणार मृत्यूचं गूढ संबंधित भामट्यांकडून चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या 4 सराफ व्यावसायिकांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा एकदा चेन स्नॅचिंगच्या घटनांत वाढ झाली होती. बहुतांशी गुन्ह्यात एकटा दुचाकीस्वार एकट्या महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून सुसाट वेगाने फरार होतं होते. त्यामुळे आरोपींच्या मुसक्या आवळणं पोलिसांना कठिण जात होतं. पण अलीकडेच पोलिसांनी साध्या वेशात विविध ठिकाणी गस्त घालायला सुरुवात केली होती. हेही वाचा- अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाकडून रेप; गुप्तांगात मिरची टाकून दिल्या नरक यातना दरम्यान, संशयास्पद भागात सोन साखळी हिसकावण्यासाठी आलेल्या दोन भामट्यांना गंगापूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावण्यासाठी आरोपींनी यु टर्न घेताच पोलिसांनी आरोपीच्या दुचाकीला आपली दुचाकी धडकवून त्यांना खाली पाडत रंगेहाथ अटक केली आहे. आरोपींनी गेल्या काही काळात 56 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली आहे. उमेश अशोक पाटील (वय- 27) आणि तुषार बाळासाहेब ढिकले (वय- 30) असं अटक केलेल्या भामट्यांची नावं आहेत. आरोपी उमेश पाटील हा दंगल नावानेही ओळखला जात असून तो सिव्हिल इंजिनिअर आहे.