JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / Bhujbal vs Patil पराभवाचीही सवय लावून घ्या, हे आता वारंवार होणार! छगन भुजबळांचा चंद्रकांतदादांना टोला

Bhujbal vs Patil पराभवाचीही सवय लावून घ्या, हे आता वारंवार होणार! छगन भुजबळांचा चंद्रकांतदादांना टोला

Chhagan Bhujbal Press conference पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांचा चांगलाच समाचार घेतला. तसंच पराभवाची सवय लावून घ्या, असा सल्लाही दिला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 3 मे : पश्चिम बंगालच्या निकालानंतर (West Bengal Election) भाजप (BJP) आणि इतर पक्षांच्या नेत्यांमध्ये तूतू-मैमै सुरू झाली आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या टीकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ‘तुम्ही जामिनावर आहात, जोरात बोलू नका’ महागात पडेल’ असं म्हटलं होतं. तसंच छगन भुजबळांच्या जामिनासाठी समीर भुजबळ तासन् तास बंगल्यात बसत असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावर भुजबळ यांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे. (वाचा- पुनवाला यांना फोन करण्याची माहिती आमच्याकडे, भाजप आमदाराचा दावा ) नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्ला चढवला. ‘मला महागात पडेल असा इशारा देता, सीबीआय-ईडीसारखी यंत्रणा यांच्या ताब्यात आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ममता दीदी झाशीच्या राणी सारख्या एक हाती लढल्या. ‘मैं मेरा बंगाल नही दुंगी असं ममतांनी सांगितलं, या माझ्या बोलण्यावर रागावण्यासारखं काय आहे’ असं भुजबळ म्हणाले. तसंच ‘पराभवाची देखिल सवय करून घ्यायला पाहिजे, कारण आता वारंवार हे फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार’ असा टोलाही भुजबळांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. (वाचा- कोरोना पॉझिटिव्ह आई-मुलीचा घरातच मृत्यू, कुजलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह ) ‘समीर भुजबळला माझ्याआधी अटक झाली होती, मत तो माझ्या जामिनासाठी यांच्याकडे कसा जाईल, असं म्हणत भुजबळांनी चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला. सीबीआय, ईडी यांचा राजकीय उपयोग होतो हे माहिती होतं, पण आता न्यायदेवतापण त्यांच्या हातात आहे का?’ असा मला प्रश्न पडल्याचं भुजबळ म्हणाले. अचानक झालेल्या पराभवाने मानसिक गडबड होणं सहाजिक आहे. त्यामुळंच वड्याचं तेल वांग्यावर अशी स्थिती असल्याचं भुजबळ म्हणाले. ‘सीबीआयनं पुनावालांना धमकी देणाऱ्यांना शोधावं’ ‘सीबीआय, आयबी यांनी इतर कामं सोडून पुनावाला यांना कोणी धमक्या दिल्या हे शोधून काढायला हवं. तसंच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करून पुन्हा लस निर्मिती सुरू करावी. पुनावाला यांच्या तक्रारीची दखल कोणी घ्यायची हा देखिल प्रश्न असून लस उत्पादनावर याचा परिणाम होण्याची भीती भुजबळांनी बोलून दाखवली. भुजबळ ऑन शरद पवार ‘बंगाल निवडणुकीत पवारसाहेबांचा अदृश्य नाही तर स्पष्टपणे हात होता. पवार साहेबांनी मदत केली हे जगजाहीर आहे. त्यात लपवण्यासारखे किंवा लपवून केलेले काही नाही. लॉकडाऊनबाबत बोलताना सुप्रीम कोर्टानं काही सूचना केल्या आहेत, त्यानुसार निर्णय घेतली’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या