JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / भर वस्तीत पोलिसांनी केली मारहाण; अपमान जिव्हारी लागल्यानं तरुणानं दिला जीव, नागपूरातील घटना

भर वस्तीत पोलिसांनी केली मारहाण; अपमान जिव्हारी लागल्यानं तरुणानं दिला जीव, नागपूरातील घटना

Suicide in Nagpur: पोलिसांनी वस्तीत येऊन सर्वांसमोर मारहाण (Police beat young man) केल्यानं एका तरुणानं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

जाहिरात

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 03 ऑगस्ट: काही दिवसांपूर्वी नागपुरात (Nagpur) हेल्मेट न घातल्यानं (Not wear helmet) पोलिसांनी केलेल्या मारहाणीत (Police Beat) एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला होता. ही घटना ताजी असताना अशीच एक घटना नागपूरात पुन्हा उघडकीस आली आहे. पोलिसांनी वस्तीत जाऊन सर्वांसमोर मारहाण केल्यानं एका तरुणानं आपल्या आयुष्याचा शेवट (Young man commits suicide) केला आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा अपमान जिव्हारी लागल्यानेच तरुणानं आत्महत्या केली असल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. महेश राऊत असं आत्महत्या करणाऱ्या 35 वर्षीय तरुणाचं नाव असून तो नागपूरातील हुडकेश्वर परिसरातील रहिवासी आहे. सोमवारी नागपूर पोलिसांनी पीडित तरुणाच्या वस्तीत जाऊन सर्वांसमोर त्याला मारहाण केली होती. सर्वांसमोर झालेला अपमान जिव्हारी लागल्यानं महेश यानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. महेशच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मृत महेश राऊत यांच्या नातेवाईकांनी हुडकेश्वर पोलिसांत धाव घेत संबंधित आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हेही वाचा- पुणे हादरलं! पैसे परत घ्यायला गेला अन् परतलाच नाही; स्मशानभूमीतच तरुणाचा शेवट नेमकं प्रकरण काय आहे? मृत महेश राऊत यानं काल 100 नंबरवर फोन करून एका मनोरुग्ण तरुणाला मारहाण होत असल्याची माहिती पोलीस कन्ट्रोल रुमला कळवली होती. पण यानंतर पोलिसांनी अधिक माहितीसाठी महेशला फोन केला. पण महेशनं पोलिसांचा फोन उचलला नाही. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी महेश राहत असलेल्या परिसरात येऊन त्याला भर वस्तीत मारहाण केली. हेही वाचा- एका हातानं गळा अन् दुसऱ्या हातानं दाबलं तोंड; 2वर्षाच्या मुलीचा आईनंच घेतला जीव परिसरातील ओळखीच्या लोकांमध्ये मारहाण झाल्याचा अपमान जिव्हारी लागलेल्या महेशनं गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच मृत महेशच्या कुटुंबीयांकडून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या