JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / नागपुरात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; धर्मांतर प्रकरणात तिघांची उचलबांगडी

नागपुरात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; धर्मांतर प्रकरणात तिघांची उचलबांगडी

Crime in Nagpur: मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरण चांगलंच गाजत आहे. याप्रकरणी दहशतवादी विरोधी पथकानं (ATS) शुक्रवारी मध्यरात्री गणेश पेठ परिसरातून तीन जणांना अटक (3 Arrest) केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 18 जुलै: मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील (UP) धर्मांतर प्रकरण (Religion Conversion case) चांगलंच गाजत आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकानं शुक्रवारी मध्यरात्री गणेश पेठ परिसरातून तीन जणांना अटक (3 Arrest) केली आहे. संबंधित तीन जणांना नेमक्या कोणत्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत खुलासा अद्याप करण्यात आला नाही. पण उत्तर प्रदेशातील गोमतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या धर्मांतरच्या गुन्ह्यांत संबंधित संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. प्रसाद रामेश्वर कवळे, कौसर आलम शौकत अली खान आणि भूप्रिया बंडो देवीदास मानकर असं अटक केलेल्या तीन संशयित आरोपींची नावं आहेत. प्रसाद कवळे हा नागपुरातील रहिवासी असून कौसर आलम शौकत अली खान हा मुळचा झारखंडच्या धनबाद येथील लोहिचारा बारा येथील रहिवासी आहे. तर भूप्रिया बंडो देवीदास मानकर हा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील वायगाव येथील रहिवासी आहे. संबंधित तिन्ही आरोपींना नागपुरातील हंसापुरी येथील डिलक्स कॉम्प्लेक्समधून अटक करण्यात आली आहे. हेही वाचा- आर्मी भरतीचं स्वप्न अधुर; मुख्यमंत्र्यांसाठी चिठ्ठी सोडून तरुणाची आत्महत्या संबंधित आरोपींकडून एक रजिस्टर जप्त करण्यात आलं आहे. ज्यामध्ये एक हजाराहून अधिक लोकांची नावं आणि पत्ते असल्याची माहिती समोर आली आहे. ही सर्व लोकं महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली येथील रहिवासी आहेत. संबंधित तिन्ही आरोपी बेकायदेशीरपणे लोकांचं धर्मांतर करत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणातच त्यांना अटक झाली असल्याचा दावा केला जात आहे. हेही वाचा- फिल्मी नाही रिअल! बदला घेण्यासाठी पत्नीनं केलं पतीच्या मारेकऱ्याशी लग्न, आणि…. खरंतर, गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील गोमतीनगर पोलीस ठाण्यात एक बेकायदेशीर धर्मांतराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील दहशतवादी विरोधी पथकानं गेल्या महिन्यात काही लोकांना अटक केली आहे. यामुळे देशभरातील बेकायदेशीर धर्मांतराच्या रॅकेटचा भांडाफोड केल्याचा दावाही करण्यात आला होता. संबंधित आरोपींवर उत्तर प्रदेशात बंदी घालून त्याच्यावर बेकायदेशीर धर्मांतर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या