नागपूर, 3 जुलै : नागपूर तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील 5 लोकांची हत्या करून नंतर आलोक माटूळकर आरोपीने (Accused Alok Matulkar) आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. नागपूरात 21 जून रोजी घडलेल्या त्या हत्यांकाडाचा दिवस आजही नागपूरकरांच्या स्मरणात आहे. अत्यंत क्रूरपणे आलोकने पाच जणांची हत्या करून नंतर स्वत: आत्महत्या केली होती. या प्रकरणात नवनव्या अपडेट समोर येत आहे. आलोक वासनेत इतका आंधळा झाला होता की त्याला बायको विजयापेक्षा अनिषामध्ये अधिक रुची होती. (Nagpur Crime News) त्यामुळे अलोक स्वतःच्या बायकोपेक्षा अनिषावर अधिक अधिकार गाजवायचा. त्यामुळे तिने कोणासोबत बोलणे, कोणाच्या साधे संपर्कात राहणे देखील अलोकला मान्य नव्हते. अनिशा आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी तिच्यावर वशीकरण मंत्राचा वापर करीत होता. कामुकतेबद्दल यूट्यूबवरून माहिती काढायचा व अनिषाला नियंत्रित करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. मात्र अनिशाला हे मान्य नव्हतं. तिला स्वतःचं आयुष्य स्वतंत्रपणे जगायचे होते. त्यात तिला आलोकला हस्तक्षेप मुळीच मान्य नव्हता. यावरून दोघात खटके उडायचे. (Nagpur Big Crime news) या हत्याकांडाची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली होती. अमिषाने आलोकविरोधात 24 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार केली होती. आलोक मारहाण करतो, मानसिक व शारिरीक त्रास देत असल्याचं त्या तक्रारीत होतं. त्यामुळे दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. अमिषाने आलोकचा मोबाइल नंबर ब्लॉक केला होता. मात्र आलोक अमिषासाठी वेडा झाला होता, आणि तरीही तो तिला मेसेज करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार आलोकने तिला मोबाइलवरील मेसेजमध्ये अल्टिमेटम दिलं होतं. याशिवाय काही दिवसात माझ्यासोबत संवाद साधला नाहीस तर याची परिणाम वाईट होतील असंही त्याने यात म्हटलं होतं. त्याच कालावधीत आलोकने ऑनलाइन सुरा मागविल्याची शक्यता आहे. हे ही वाचा-
मेव्हणीला वश करण्यासाठी आलोकचे भयावह प्रकार;नागपूर हत्याकांडाची महत्त्वाची अपडेट
काय घडलं त्या रात्री ? त्या रात्रीदेखील आलोक थेट अमिषाच्या घरीच गेला. अमिषा घरी मोबाइलवर चॅट करीत होती. आलोकला पाहताच तिने मित्राला आलोक आल्याचं सांगितलं. त्यानंतर मात्र आमिषाने फोन बाजूला ठेवून ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं. पुढील 27 मिनिटांत (27 minute audio clip of the Nagpur massacre) काय होणार याची कल्पनाही तिने केली नसेल. सुरुवातील दोघांमध्ये औपचारिक बोलणं होतं. काही वेळानंतर आलोक संतापाच्या भरात शिव्या देऊ लागतो. आलोकने अमिषावर वार केला असल्याने तिच्या किंचाळण्याचा आवाज ऑडिओ क्लिपमध्ये येत आहे. साधारण 8 व्या मिनिटाला अमिषा जोरजोरात श्वास घेऊ लागले. त्यावेळी आलोक तिला मरत का नाही, असंही म्हणतो. त्यानंतर पुढील काही मिनिटं कसलाच आवाज येत नाही. आणि अचानक पाण्याचा आवाज येतो. (यावेळी आलोक अमिषाला मारल्यानंतर चाकू पाण्याने धूवत असावा) त्यावेळी आलोकच्या सासू लक्ष्मी यांचा आवाज येतो. लेकीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्या घाबरतात. जावई तुम्ही काय केलं, असा सवाल करतात. दुसरीकडे आलोक त्यांना शांत राहायला सांगतो. मात्र लेकीचा मृतदेह पाहून लक्ष्मीबाई शांत बसत नाहीत. त्यांना शांत करण्यासाठी आलोक त्यांच्यावरही सुरा चालवतो. ऑडिओ क्लिपमध्ये बराच वेळ लक्ष्मीबाईंच्या ओरडण्याचा आवाज येत राहतो. एबीपीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
या 27 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमध्ये त्या रात्री घडलेला सर्व प्रकार रेकॉर्ड झाला आहे. हा नक्कीच पोलिसांसाठी मोठा पुरावा आहे. यानंतर ती ऑडिओ क्लिप बंद होते. (आलोकने कदाचित तिचा फोन बंद करून स्विच ऑफ केला असण्याची शक्यता आहे) यानंतर आलोक स्वत:च्या घरी पोहोचतो. आधी पती विजयाचा गळा चिरतो. त्याला अडवायला जाणाऱ्या मुलीचाही गळा चिरून संपवतो. याशिवाय दुसरीकडे 12 वर्षीय साहित झोपलेला असतो, त्याची झोपेतच उशीने तोंड दाबून हत्या करतो. या संपूर्ण प्रकारानंतर पहाटे चार वाजेच्या सुमारास स्वत:च्या खोलीत पंख्याला साडी बांधून आत्महत्या करतो.