JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / भरदिवसा शहरातील तडीपार गुंडाची दगडाने ठेचून हत्या; परिसरात खळबळ

भरदिवसा शहरातील तडीपार गुंडाची दगडाने ठेचून हत्या; परिसरात खळबळ

हा तडीपार गुंड मित्रासोबत ओली पार्टी करण्यासाठी गेला होता. तेव्हा हा प्रकार घडला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 4 जून : अमरावती शहर आता पुन्हा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळते की काय असे वाटायला लागले आहे. एका आठवड्या पाठोपाठ एक खुनाच्या रक्तरंजित घटना घडल्या आहे. आज पुन्हा भर दुपारी छत्री तलाव परिसरात तडीपार गुंड अशोक सरदार याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. जेवड नगर येथील रहिवासी 40 वर्षीय अशोक उत्तम सरदार आपल्या जेवड नगर परिसरातील मित्रा सोबत ओली पार्टीला गेला होता. छत्री तलाव बाजुच्या एका मोठ्या झाडाखाली त्यांची ओली पार्टी रंगली होती. यादरम्यान पार्टीत असलेल्या अतुल तूपाडे व राजेश थोरात यांच्यासोबत वाद झाला व या वादातून अतुल व राजेश यांनी दगडाने अशोकच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यातच अशोक याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अतुल तुपाडे, राजेश थोरात, अशोक सरदार एकाच परिसरातील रहिवासी आहेत. अशोक सरदार याने दोन वर्षापूर्वी बरकत चव्हाण या इसमाची हत्या केली होती. तसेच अशोकवर अन्य काही गुन्हे असल्याने त्याला अमरावती शहरातून तडीपार करण्यात आले होते व तो त्याच्या कुटुंबीयांसोबत नेर येथे वास्तव्यास होता. मात्र या लॉकडाऊनच्या काळात अशोकचे अमरावतीला जाणे-येणे जास्त वाढले. हे ही वाचा- पुणे जिल्ह्यातील गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मारेकऱ्याला अटक, असा लागला सुगावा दस्तुर नगर परिसरात अतुल तूपाडे याचं पानाचं छोटं दुकान असून या पानठेल्यावर अतुलला धमकावून अशोक नेहमीच पान सिगारेट घेत असे. यातून एक महिन्यापूर्वी अशोकने अतुल तुपाडे याला चांगलीच मारहाण सुद्धा केली होती. आज सुरू असलेल्या पार्टीत दारू प्यायल्यानंतर अशोक व अतुल तुपाडे यांचा वाद झाला. जुन्या रागातच अशोकच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला व यात त्याचा  जागीच मृत्यू झाला. यानंतर सर्वजण घटनास्थळावरून पसार झाले. राजापेठ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ताफा व पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्यू आर टी पथक ही रवाना झाले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतकाला शव विच्छेदनाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अतुल तुपाडे व राजेश थोरात या दोघांना दोघांना अटक केली आहे. खूनाची माहिती मिळताच अशोकची आई-बहीण आणि नातेवाईकांनी घटना स्थळी धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला. घटनास्थळी दारूच्या बाटल्या, चिलम, चुलीवर भांड्यात खाण्याचे पदार्थ आढळून आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या