JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / नागपूरमध्ये पॉश फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला एजंटला अटक, तीन मुली ताब्यात

नागपूरमध्ये पॉश फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला एजंटला अटक, तीन मुली ताब्यात

Nagpur Sex Racket: नागपूरमध्ये सेक्स रॅकेट (Sex Racket) चा पदार्फाश झाला आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी (Nagpur police) तीन तरुणींना ताब्यात घेतले.

जाहिरात

राजस्थानातल्या बाडमेरमध्ये गोल्डन स्पा नावाने स्पा सेंटर चालवलं जात होतं. त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. तिथे 5 तरुणींना आणि 2 युवकांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 14 जुलै: नागपूरमध्ये (Nagpur) सेक्स रॅकेट (Sex Racket) चा पदार्फाश झाला आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी (Nagpur police) तीन तरुणींना ताब्यात घेतले असून एका महिला सेक्स रॅकेट (Sex Racket Agent) एजंटला अटक करण्यात आली आहे. नागपुरातील मनिषनगरमधील दिलीप रेसिडेन्सी इमारतीतील पॉश फ्लॅटमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होतं. 34 वर्षीय प्रियंका शोएब अफजल सैय्यद असं महिला एजंटला अटक केली आहे. कुख्यात महिला एजंट गेल्या अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेटमध्ये अॅक्टिव्ह होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी महिला एजंट तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना झटपट पैसे कमवण्याचं आमिष दाखवायची आणि या रॅकेटमध्ये ढकलायची. तरुणींचे फोटो पाठवून ती ग्राहकांना आकर्षित करायची. गेल्या काही दिवसांपासून तिनं मनिष नगरमधील दिलीप रेसिडेन्सी अपार्टंमेंटमधील 401 क्रमाकांच्या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट सुरु केला होता, पोलिसांनी अशी माहिती दिली आहे. हेही वाचा-  आईशप्पथ! ड्रायव्हरची चक्क बसच्या टपावर जाऊन धुलाई, बघा Live Video गेल्या काही दिवसांपासून फ्लॅटवर अनेक तरुणींची होणारी गर्दी पाहता शेजाऱ्यांना संशय आला. शेजारच्यांनी सामाजिक सुरक्षा विभागाचे पीआय ज्ञानेश्वर भोसले यांना यांसंबंधित माहिती दिली. शनिवारी त्यांनी सेक्स रॅकेट सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर सापळा रचला. पोलिसांनी एक पंटर पाठवून मुलींची मागणी केली. त्यावेळी प्रियंकानं 5 हजार रुपयांत मुलीचा सौदा केला. काही वेळात तरुणीला आणि पंटरला रुममध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर पंटरनं इशारा करताच दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी फ्लॅटवर छापा घातला. फ्लॅटमधील अन्य तीन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या तिन्ही तरुणी गरीब घरातील आहे. त्यातील एक तरुणी ब्युटी पार्लरला कामाला होती. या प्रकरणी पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला एजंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या