JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / अल्पवयीन मुलीला पळवून नेताना दिल्लीचे दोन 'आशिक' जेरबंद; नागपुरातील फिल्मी स्टोरी

अल्पवयीन मुलीला पळवून नेताना दिल्लीचे दोन 'आशिक' जेरबंद; नागपुरातील फिल्मी स्टोरी

अल्पवयीन मुलीने सोशल मीडियाचा (minor girl use social media) वापर करायला सुरुवात केल्यानंतर, दिल्लीतील एका तरुणाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं (Trapped in love affair) होतं.

जाहिरात

(File Photo)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 23 सप्टेंबर: गेल्या जवळपास पावणे दोन वर्षांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. शिक्षण क्षेत्रावर कोरोना संसर्गाचा मोठा परिणाम झाला आहे. दरम्यानच्या काळात पर्याय म्हणून अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाचा (Online education) पर्याय अवलंबला आहे. त्यामुळे अगदी आठ-दहा वर्षांच्या मुलांच्या हातातही स्मार्टफोन पडला आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात मोबाइल आल्यानं त्याचा गैरवापरही वाढला आहे. तसेच ही मुलं विविध आमिषांना पटकण बळी पडत आहेत. अशीच एक घटना वर्ध्यात घडली आहे. वर्ध्यातील एका अल्पवयीन मुलीने वडिलांनी ऑनलाइन शिक्षणासाठी घेऊन दिलेल्या फोनचा वापर भलत्याच कारणासाठी केला आहे. पीडित मुलीने सोशल मीडियाचा (minor girl use social media) वापर करायला सुरुवात केल्याने, दिल्लीच्या एका तरुणाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं (Trapped in love affair) होतं. तसेच पीडित मुलीला दिल्लीला पळवून नेण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन आरोपींसह पीडितेला नागपूर पोलिसांनी ताब्यात (2 arrested) घेतलं आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने पीडित मुलीची सुटका करण्यात यश आलं आहे. हेही वाचा- ‘मानसिक आजार दूर करण्यासाठी शरीरसंबंध ठेवावे लागतील’, YOUTUBE डॉक्टरकडून अजब उपचार पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ती पुलगाव येथील रहिवासी आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी वडिलांनी पीडित मुलीला स्मार्टफोन घेऊन दिला होता. यानंतर मुलीने सोशल मीडिया वापरायला सुरुवात केली. यानंतर तिची ओळख दिल्लीतील जहागिरपुरी येथील रहिवासी असणाऱ्या मोहम्मद चांद कुरेशी मोहम्मद इस्लाम कुरेशी याच्याशी झाली. त्यानंतर दोघंही बरेच दिवस व्हॉट्सअॅपवरून एकमेकांच्या संपर्कात होते. हा प्रकार सुमारे तीन महिने सुरू होता. हेही वाचा- एक नव्हे तर 100 महिलांना लग्नाचं आमिष देऊन फसवलं, प्रेमराज अखेर अटकेत दरम्यान, 20 सप्टेंबर रोजी मुख्य आरोपी मोहम्मद चांद कुरेशी आणि मोहम्मद सादिक साबीर हे दोघे मुलीला पळवून घेऊन जाण्यासाठी दिल्लीहून पुलगाव याठिकाणी आले. त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी पीडित मुलगी घराबाहेर पडल्यानंतर आरोपी तिला घेऊन नागपूरला आले. नागपुरातून दिल्लीला रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी आरोपींना नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलं आहे. तांत्रिक तपास केल्यानं मुलीची सुटका करणं पोलिसांना शक्य झालं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या