JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai News : चर्चगेटमधील वसतिगृहात तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला; नेमकं काय घडलं?

Mumbai News : चर्चगेटमधील वसतिगृहात तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला; नेमकं काय घडलं?

Mumbai News : मुंबईतील चर्चगेटमधील मुलींच्या वसतीगृहात एका तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संशयित आरोपीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जून : मुंबईतील चर्चगेट परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चर्चगेटमधील मुलींच्या वसतिगृहात तरुणीची हत्या करण्यात आली आहे. अतिप्रसंग करून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरुणीचा मृतदेह हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावर विवस्त्र अवस्थेत आढळला. दरम्यान, संशयित आरोपी सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याची समोर आलं आहे. घटनेनंतर संशयित आरोपी सुरक्षारक्षकाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती आहे. आरोपीने चर्नी रोड दरम्यान रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. रेल्वे पोलिसांनी मृतदेह दुपारीच शवविच्छेदनासाठी पाठवला होता. पीडितेवर अतिप्रसंग करून त्याने तिची हत्या केली आणि स्वतः रेल्वेखाली उडी मारून जीव दिला. वाचा - धक्कादायक! पाईपलाईन फोडली म्हणून तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, अहमदनगर हादरलं! गुन्ह्यानंतर रेल्वेखाली घेतली उडी मृत आरोपी ओमप्रकाश कनोजियावर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आरोपीवर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपीने पीडित तरुणीचा बलात्कार करून हत्या केल्याचं समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मृत आरोपी ओमप्रकाश कनोजियावर भादवी कलम 302 आणि 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव ओमप्रकाश कनोजिया असे असून तो तब्बल 18 वर्षे या वसतिगृहात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. पीडितेवर अतिप्रसंग करून त्याने तिची हत्या केली आणि स्वतः रेल्वेखाली उडी मारून जीव दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या