JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Vasai News : धबधबा बघायला गेल्यावर नदीत उतरला, अंदाज चुकला अन् बुडाला; तरुणाचा मृत्यू

Vasai News : धबधबा बघायला गेल्यावर नदीत उतरला, अंदाज चुकला अन् बुडाला; तरुणाचा मृत्यू

Vasai News : धबधब्याखाली असलेल्या नदीत तो पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला.

जाहिरात

धबधबा बघायला गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राजा मयाल, ठाणे, 14 जुलै : धबधबा बघायला गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना वसई विरारजवळच्या चिंचोटी इथं घडली. सुमित राधेश्याम यादव असं मुलाचं नाव आहे. मुंबईत विलेपार्ले इथं राहणारा सुमित चिंचोटी धबधब्याजवळ फिरायला गेला असताना दुर्घटना घडली. यंदाच्या पावसाळ्यात वसईत झालेला हा पाचवा मृत्यू आहे. यामुळे पुन्हा एकदा पावसाळी पर्यटनासाठी जाणाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे. पावसाला सुरुवात झाली असून पर्यटक वसई विरारच्या समुद्रकिनाऱ्यावर तसेच तुंगारेश्वर आणि चिंचोटी येथील धबधबे पाहण्यासाठी येत असतात. पावसाळ्यात ही ठिकाणे धोकादायक बनली असून त्यावर पोलिसांनी यापूर्वीच बंदी घातली आहे. गुरुवारी दुपारी मुंबईच्या विलेपार्ले येथे राहणारा सुमित राधेश्याम यादव (वय 18 वर्षे) तरुण आपल्या 4 मित्रांसोबत वसई पूर्वेच्या चिंचोटी येथील धबधब्यावर फिरायला आला होता. दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात घातली कुऱ्हाड, छ. संभाजीनगर हादरलं धबधब्याखाली असलेल्या नदीत तो पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला पाण्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीचे पात्र खोल असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दुपारच्या सुमारास हा मुलगा डोहात पडून मरण पावला होता. या घटनेची माहिती पोलिसांना संध्याकाळी मिळाली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा तसेच शवविच्छेदन करून तो कुटुंबियांच्या ताब्यात दिला. नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन झिंकलवाड यांनी याबाबत माहिती दिली. सुमित आपल्या मित्रांसह मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्यानंतर तो चिंचोटी येथील धबधब्यात गेला. त्याला पोहायला येत नव्हते तरी तो पाण्यात का गेला हे आम्हाला समजले नाही, अशी माहिती सुमितचा चुलत भाऊ पिंटू यादव यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या