JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Nawab Malik vs NCB: फ्लेचर पटेलसोबतची लेडी डॉन कोण? फिल्म इंडस्ट्रीत काय करतेय? NCB ने खुलासा करावा - नवाब मलिक

Nawab Malik vs NCB: फ्लेचर पटेलसोबतची लेडी डॉन कोण? फिल्म इंडस्ट्रीत काय करतेय? NCB ने खुलासा करावा - नवाब मलिक

Nawab Malik vs NCB: एनसीबीच्या कारवाई संदर्भात आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत काही सवाल उपस्तित केले आहेत.

जाहिरात

फ्लेचर पटेलसोबतची लेडी डॉन कोण? फिल्म इंडस्ट्रीत काय करतेय? नवाब मलिक यांचा सवाल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या (NCB) कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एनसीबीने कारवाई दरम्यान बनवलेला पंच फ्लेचर पटेल (Fletcher Patel) कोण आहे? तसेच फ्लेचर पटेलसोबत फोटोत असणारी लेडी डॉन (Lady Don) कोण आहे? असा सवालही नवाब मलिक यांनी विचारला आहे. नवाब मलिक यांनी म्हटलं, एनसीबीच्या कारवाईत पंचनामा करण्यासाठी स्वतंत्र पंच असलेला फ्लेचर पटेल कोण आहे? फ्लेचर पटेल याच्यासोबत फोटो असलेली लेडी डॉन कोण आहे? फ्लेचर पटेल त्यांच्यासोबत कुठे-कुठे जातो? मुंबईत कसलं रॅकेट सुरू आहे? फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या सोबत फिल्म इंडस्ट्रीत काय दहशत निर्माण करत आहेत? इंडस्ट्रीत दहशत निर्माण करुन पैसे उकळण्याचे काम करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मी एनसीबीला सांगतो की एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करावा. फ्लेचर पटेल ज्या महिलेसोबत आहे ती एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ता आहे. ती वकील सुद्धा आहे. फिल्म इंडस्ट्रीतील बरेच लोक तिच्या कार्यालयात हजेरी लावत आहेत. वानखेडे हे फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करत आहेत. जेव्हा माहिती मिळेल तेव्हा या संदर्भातीलही पर्दाफाश करेल असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. फ्लेचर पटेल आणि एनसीबीचा काय संबंध? नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, कोण आहे फ्लेचर पटेल? त्याचा एनसीबी आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहे? एनसीबीने याचा खुलासा करावा. समीर वानखेडे यांच्या पब्लिसिटी ते अनेक कार्यक्रम आयोजित करत आहेत. फ्लेचर पटेल यांच्यासोबत समीर वानखेडे यांचे फोटो काय सांगतात ? छापेमारीच्या कारवायांमध्ये कौटुंबिक मित्रालाच पंच केलं का? पंच म्हणुन जवळची लोक आहेत, या कारवाई मग ठरवून केल्या गेल्या का ? कोणते रॅकेट मुंबईत चालु आहे, फ्लेचर पटेल लेडी डॉन फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय करतायेत? फ्लेचर पटेल आणि लेडी डॉनच्या मदतीने फिल्म इंडस्ट्रीत काय सुरू आहे, वानखेडे हे फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करतायेत असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तीन केसेसमध्ये एकच पंच 25/11/2020 रोजी करण्यात आलेल्या कारवाईतील पंचनाम्यामध्ये फ्लेचर पटेल पंच आहे. त्यानंतर 09 /12/2021 रोजीच्या सर्च ऑपरेशनमध्ये फ्लेचर पटेल पंच हेच आहेत आणि 2 जानेवारी 2021 रोजीच्या छापेमारी करण्यात आली त्यातही फ्लेचर पटेल पंच आहेत. तीन केससमध्ये फ्लेचर पटेल पंच आहेत समीर वानखेडे यांनी याचं उत्तर द्यावे असा सवालही नवाब मलिकांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या