JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत दरवर्षी भरणाऱ्या जागतिक ‘Hip Hop Championship' ला अच्छे दिन येणार तर कधी

मुंबईत दरवर्षी भरणाऱ्या जागतिक ‘Hip Hop Championship' ला अच्छे दिन येणार तर कधी

बॉलिवूड (BOLLYWOOD) , फ्री स्टाईल, कंटेम्पररी अशा अनेक नृत्यप्रकारांचा समावेश होताना दिसतो. यातीलच एक महत्वपूर्ण आणि तितकाच धडाकेबाज प्रकार म्हणजे…हिप-हॉप ! (Hip Hop Championship)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 मे : नृत्य हा भारतीय संस्कृतीचा नेहमीच एक महत्वपूर्ण भाग राहिला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रामुख्याने भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी, लावणी अशा एक ना अनेक नृत्यप्रकारांचा समावेश होतो. हे परंपरागत नृत्यप्रकार तर आहेतच, परंतु आता जागतिकीकरणामुळे अनेक विदेशी तसेच पाश्चात्य कला प्रकारांना आणि संस्कृतीला आपण स्वीकारत आहोत. यातच बॉलिवूड (BOLLYWOOD) , फ्री स्टाईल, कंटेम्पररी अशा अनेक नृत्यप्रकारांचा समावेश होताना दिसतो. यातीलच एक महत्वपूर्ण आणि तितकाच धडाकेबाज प्रकार म्हणजे…हिप-हॉप ! (Hip Hop Championship)

हिप-हॉप हा अमेरिकी लोकांनी विकसित केलेला कलाप्रकार आहे. रॉकिंग, पॉपिंग, वॅकींग हे हिप-हॉपशी संबंधीत असलेले नृत्यप्रकार आहेत. मुंबईमध्ये (mumbai) दरवर्षी ‘इंडियन हिप- हॉप चॅम्पियनशीप’ ही बहुचर्चित राष्ट्रीय स्पर्धा भरवली जाते. यंदा या भव्य स्पर्धेचं दहावं वर्ष आहे.

हे ही वाचा : Pension Scheme: खासगी नोकरी करत असाल तरीही मिळेल पेन्शन; ‘या’ सरकारी योजनेचा घ्या फायदा

२०१२ साली सुरू झालेली ‘इंडियन हिप-हॉप चॅम्पियनशीप’ (Hip Hop Championship) आता दशकपूर्ती करून यशाचा पल्ला गाठत आहे. या स्पर्धेत दरवर्षी भारतभरातील वेगवेगळ्या राज्यातून हजारो स्पर्धक सहभाग घेतात. वेगवेगळे राउंडस पार करत सुवर्णपदक मिळवणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना ‘जागतिक हिप-हॉप चॅम्पियनशिप’ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते.

संबंधित बातम्या

मुंबईत होणाऱ्या या स्पर्धेचं व्यासपीठ अनेकांसाठी आयुष्यातली सुवर्णसंधी असते. या व्यासपीठावर सादरीकरण करता यावं हे अनेकांचं स्वप्न असतं. हिप हॉपसाठी केलेली मेहनत पणाला लावून विजेतेपद मिळवण्याच्या ध्येयाने हजारो स्पर्धक दरवर्षी यात सहभागी होतात.  

मुंबईतील ही स्पर्धा सुरू करणारे म्हणजेच ‘इंडियन हिप-हॉप चॅम्पियनशीप’ सुरू केली अंजन शिवकुमार यांनी. त्यांच्याशी बोलताना त्यांचं हिपहॉपवर असलेलं प्रेम सतत जाणवत राहिलं. हिपहॉप या नृत्यप्रकाराबद्दल बोलताना तसेच या स्पर्धेबद्दल सांगत असताना ते उत्स्फूर्तपणे बोलत होते. मात्र, त्याचवेळी हिप हॉप या कलाप्रकाराला कुणी आधार देत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. जागतिक हिपहॉप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांना तरी किमान आधार मिळायला हवा अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केलीय.  हिपहॉप संस्कृती वाढावी म्हणून नाही तर, हिपहॉप ही एक कला आहे म्हणून तिचा आदर करायला, ती कला जगवायला शिकलं पाहिजे असा संदेश त्यांनी दिला आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या