मुंबई, 18 जुलै: विक्रोळीमध्ये एक दुमजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीतील (Vikhroli) पंचशील नगर भागात दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. (ground-plus-one residential building collapsed) यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत. NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य (Rescue operation is underway) वेगात सुरु आहे. (Mumbai’s Vikhroli area) विक्रोळीतील पंचशील नगर भागात पावसामुळे पाच-सहा घरांवर दरड कोसळली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झालेत. मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. दरम्यान पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (killing three people, as per BMC)
मुंबईत संततधार पाऊस झाल्यानं विक्रोळी भागात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून तीन मृतदेह बाहेर काढले गेले आहेत. तर पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज असल्याचं एनडीआरएफचे उप-कमांडंट आशीष कुमार यांनी सांगितलं.
विक्रोळी पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पंचशील चाळीतील सूर्या नगर परिसरात ही घटना घडली. शनिवारी मध्यरात्री दोन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, तिघा जणांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं. दोन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. Mumbai Train Update: मध्य रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका, पश्चिम रेल्वे सुरळीत विक्रोळीमध्ये डोंगराळ वस्तीमध्ये एका घरावर दुसरे असे तीन-चार घरे एकमेंकावर कोसळली आहेत. मृतामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.