विधान परिषद निवडणुकीसाठी मतांची गोळाबेरीज सुरू झाली आहे. अपक्षांचे मत मिळवण्यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्न करत आहे.
विरार, 15 जून : विधान परिषद निवडणुकीसाठी (vidhan parishad election ) आता तिन्ही पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीत सुद्धा अपक्षांच्या मताला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर (MLA Hitendra Tahkur) यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. पण, आता विधान परिषदेला बविआचे आमदार क्षितीज ठाकूर (mla kshitij thakur) हे अमेरिकेला रवाना झाल्यामुळे एक मत कमी पडणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतांची गोळाबेरीज सुरू झाली आहे. अपक्षांचे मत मिळवण्यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्न करत आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हिंतेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे तीन मत महत्त्वाची ठरणार आहे. पण विधान परिषद निवडणुकीला बहुजन विकास आघाडीचे एक मत कमी पडणार असल्याची शक्यता आहे. बविआ आमदार क्षितीज ठाकूर कौटुंबिक कामासाठी न्यूयॉर्कला गेले आहे. त्यामुळे मतदानासाठी क्षितीज ठाकूर येणारं का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर क्षितीज ठाकूर निवडणुकीला गैरहजर राहिले तर त्यांचं एक मत कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्षितिज ठाकुरांच्या एका मताचा कोणाला फटका बसणार हे पाहण्याचे ठरणार आहे. विधानपरिषदेवर निवडून येण्याचे गणित काय? विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला एकूण 27आमदारांच्या मतांची आवश्यकता असते. भाजपाकडे मित्रपक्षांसह मिळून एकूण ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. या संख्याबळानुसार भाजपाच्या ४ जागा अगदी सहज निवडून येतील. राष्ट्रवादीकडे ५४ आमदार, शिवसेनेकडे ५६ आमदार आणि काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत. या संख्याबळानुसार विधान परिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार निवडून येतील. काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल, तर दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसला भाजपाशी लढत द्यावी लागेल. ( या’ जिल्ह्यातील NHM मध्ये 60,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर करा अर्ज ) दरम्यान, या संख्याबळानुसार प्रत्येक पक्षातील नेत्यांकडून विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. भाजपाच्या तर ५ जागा रिक्त होत असून ४ जागाच निवडून येत आहे. पण, भाजपने पाचवी जागा सुद्धा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बविआचे मत कमी पडले तर काय होईल? दरम्यान, बविआचे एक मत कमी जरी पडले तरी त्याचा फारसा परीणाम होणार नाही. कारण, शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यांचं एक मत आधीच कमी झालं आहे. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे ईडीच्या कोठडीत आहे. मतदान करण्यासाठी परवानगी मिळावी याबद्दल कोर्टात सुनावणी सुरू आहे. जर त्यांना कोर्टाने परवानगी दिली तर मतांचा कोटा 27 चा असेल. जर मलिक आणि देशमुख यांना परवानगी मिळाली नाही तर कोटा 26 (25.90) चा होईल. जर बविआचे आमदार क्षितिज ठाकूर आले नाहीत तर (25.81) चा कोटा होईल. त्यामुळे क्षितीज ठाकूर यांनी मतदान केलं आणि नाही केलं तरी फार असा फरक पडणार नाही. जर 26 चा कोटा झाला तर भाजपला 130 मतं लागणार आहे. त्यामुळे भाजपला आणखी गोळाबेरीज करावी लागणार आहे.