JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यात अंडरवर्ल्डची एन्ट्री, सीबीआयच्या मुंबई-महाबळेश्वरमधील छापेमारीत धक्कादायक माहिती उघड

देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यात अंडरवर्ल्डची एन्ट्री, सीबीआयच्या मुंबई-महाबळेश्वरमधील छापेमारीत धक्कादायक माहिती उघड

सीबीआयकडून 34 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि महाबळेश्वरमध्ये छापेमारी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचे धागेदोरे दाऊद टोळीपर्यंत पोहोचल्याचा संशय सीबीआयला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जुलै : केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने (CBI) काही दिवसांपूर्वी DHFL प्रवर्तक कपिल वाधवान (Kapil Wadhwan) आणि धीरज वाधवान (Dhiraj Wadhwan) यांच्याविरधात सर्वात मोठ्या बँकिंग फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे सीबीआयकडून याप्रकरणी आता प्रचंड झाडाझडती सुरु आहे. सीबीआयने आज आरोपी वाधवान बांधवांच्या सातारा जिल्ह्यातील महाबाळेश्वर (Mahabaleshwar) येथील बंगल्यावर छापा टाकला. यावेळी सीबीआयला काही महागडे पेंटिग्ज मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी सीबीआयने केलेल्या तपासात या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचे धागेदोरे थेट दाऊद इब्राहिमपर्यंत (Underworld Don Dawood Ibrahim) जात असल्याचा संशय वर्तवला जातोय. दुसरीकडे राज्यात सत्ता परिवर्तनानंतर वाधवान बंधू यांच्याविरोधातील कारवाईला वेग आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. नेमकं प्रकरण काय? देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. सीबीआयकडून 34 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि महाबळेश्वरमध्ये छापेमारी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचे धागेदोरे दाऊद टोळीपर्यंत पोहोचल्याचा संशय सीबीआयला आहे. कारण या छापेमारीत सीबीआयच्या हाती संशयास्पद कागदपत्रे लागली आहेत. त्यामुळे या बँक घोटाळ्यात अंडरवर्ल्डची एन्ट्री झाल्याचं मानलं जात आहे. देशातला आतापर्यंत सर्वात मोठा बँक घोटाळा उघड झालाय. 34 हजार 615 कोटींच्या घोटाळ्याचे धागेदारे अंडरवर्ल्डपर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयने शुक्रवारी मुंबईत अजय नावंदरच्या घरावर छापे टाकले. सीबीआयनं 40 कोटी रुपयांची पेटिंग्स आणि मूर्ती जप्त केल्यात. या पेटिंग्स आणि मूर्ती बँकेच्या घोटाळ्याच्या पैशातून खरेदी केल्याचा आरोप आहे. अजय नावंदर हा दाऊदचा हस्तक छोटा शकीलचा जवळचा साथीदार आहेत. घोटाळ्यातील काही पैसा नावंदरच्या माध्यमातून फिरवण्यात आल्याचा संशय सीबीआयला असून त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आलाय. सीबीआय अधिकाऱ्यांनी या छापेमारीबाबत दिलेल्या माहितीनुसार, रेबिका दीवान आणि अजय रमेश नावंदर यांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. बँक घोटाळ्याचे पैसे आरोपींनी इतर लोकांनाही दिल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासात या दोघांची नावं समोर आली आहेत. रेबिका दीवान याप्रकरणातील मुख्य आरोपी कपिल वाधवान यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती मिळत आहे. ( दुर्गवाडी डोंगराचा तडा वाढू लागला, परशुराम घाट आणखी 3 दिवस बंद ) मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयनं महाबळेश्वर आणि मुंबईतील काही ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान, अनेक महागडे पेटिंग्स आणि मूर्ती जप्त करण्यात आल्या. याव्यतिरिक्त संशयास्पद कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणंही सीबीआयकडून जप्त करण्यात आली आहेत. सीबीआयनं 17 बँकांच्या समूहाला 34 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपांतर्गत 22 जून 2022 रोजी एफआयआर दाखल केला होता आणि या प्रकरणी त्याच दिवशी तब्बल 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. याप्रकरणी आरोप आहे की, सर्व नियम धाब्यावर बसवून आरोपींनी बँकेतून घेतलेली रक्कम त्यांच्या वैयक्तिक कामासाठी वापरली. त्यामुळे बँकांचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. एकंदरीतच बँक घोटाळ्यात अंडरवर्ल्डची झालेली एन्ट्री हा देशासाठी मोठा धोका म्हणता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या