मुंबई : टेक कंपनी Apple मंगळवारी भारतात आपलं पहिलं अधिकृत स्टोअर ‘Apple BKC’ सुरू करत आहे. या स्टोअरच्या लॉन्चिंगसाठी CEO टीम कुक भारतात आले आहेत. त्यांनी भारतात आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय केलं याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे चांगलीच चर्चाही रंगली आहे. या स्पेशल फोटोसाठी टिम कुक यांनी बॉलिवूडच्या अभिनेत्रीचे आभारही मानले. टिम कुक यांनी माधुरी दीक्षितची खास भेट घेतली. यावेळी सौंदर्यवती माधुरी दीक्षित आणि टिम कुक यांनी मुंबईत वडापाव खाण्याचा आनंद घेतला. कुक यांनी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेची भेट घेतली.
x
या भेटीचा एक फोटो माधुरीने ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये टीम कुक आणि माधुरी दीक्षित रेस्टॉरंटमध्ये वडा पाव खाताना दिसत आहेत. टिम कुक यांनी फोटो रिट्विट करून लिहिले, ‘मी पहिल्यांदा वडापाव खाल्ला खूप सुंदर होता. वडापावची ओळख करुन दिल्याबद्दल थँक्यू माधुरी दीक्षित असं त्यांनी ट्विट केलं आहे. माधुरी दीक्षित सोबत टिम कुक यांनी वडापाव खाल्ला. सुंदर संध्याकाळ माधुरी आणि टिम कुक यांनी वडापाव आनंदानं खात घालवली. या निमित्ताने टिम कुक यांनी पहिल्यांदाच वडापाव खाल्ल्याचंही ट्विट करून सांगितलं. त्यांच्या या ट्विटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. सध्या या फोटोची चर्चाही होत आहे. अॅपल स्टोअर सुरू झाल्यानंतर बुधवारी टीम कुक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचीही भेट घेऊ शकतात. याशिवाय ते निर्यात आणि उत्पादन यासारख्या धोरणात्मक मुद्द्यांवरही मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.