Mumbai: Newly sworn-in Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addresses his supporters on his arrival at state's BJP office, in Mumbai, Saturday, Nov. 23, 2019. In a stunning turn of events early morning, Fadnavis and NCP leader Ajit Pawar took oath as the Chief Minister and Deputy Chief Minister, respectively. (PTI Photo/Shashank Parade)(PTI11_23_2019_000189B) *** Local Caption ***
विवेक कुलकर्णी, मुंबई 24 नोव्हेंबर : भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज दादरमधल्या वसंतस्मृती कार्यालयात झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या बैठकीची माहिती आशीष शेलार यांनी पत्रकारांना दिली ते म्हणाले, विश्वासदर्शक ठराव भाजप जिंकेल अशी रणनीती ठरवण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. जनादेशाची हेटाळणी शिवसेनेनी केली याचा उल्लेख आमदारांनी केला. कालच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रात आनंदाचं आणि आत्मविश्वासचं वातावरण झालंय. यावेळी शेलार यांच्यासोबत आमदार कालिदास कोळंबकर हे उपस्थित होते आणि त्यांचा उल्लेख सर्वात ज्येष्ठ विधानसभा सदस्य असा आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आला. भाजपला आपल्या आमदारांवर विश्वास आहे. त्यांना कुठेही वेगळं ठेवण्याची गरज नाही. ज्यांना आमदार फुटण्याची भीती वाटते तेच आमदारांना कोंडून ठेवत आहेत असंही शेलार म्हणाले. ‘पवारसाहेबच माझे नेते’, अजित पवारांनी स्पष्ट केली भविष्याची दिशा शेलार यांच्या या उल्लेखाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यपालांनी फडणवीस यांना 30 नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करायला सांगितलं आहे. त्या आधी विधानसभेचं अधिवेशन बोलावून त्यात हंगामी अध्यक्षांची निवड करावी लागते. सभागृहातला सर्वात ज्येष्ठ आमदार यासाठी निवडला जातो. कोळंबकर हे सलग तब्बल आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टाचे ते 2 निकाल ठरले ऐतिहासिक वडाळा मतदारसंघातून ते सलग सात वेळ निवडून आले होते. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची आधी ओळख होती. नंतर कोळंबकर हे नारायण राणे यांच्यांसोबत काँग्रेसमध्ये गेले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून त्यांची फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली होती. त्यामुळे त्यांचं नाव विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाकरता भाजप पुढे करू शकते अशी शक्यता व्यक्त केली जातेय. दादा म्हणताच पवारच माझे नेते राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असून शरद पवार साहेब हे आमचे नेते आहेत, असं स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांची विधीमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मांडलेली भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ‘काळजी करण्याचं कारण नाही. सगळं काही ठिक आहे. फक्त थोड्या संयमाची गरज आहे. तुमच्या पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच मी राष्ट्रवादीत असून यापुढेही कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे. शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. आमची भाजप-राष्ट्रवादी युती महाराष्ट्राला पुढील पाच वर्षांसाठी स्थिर सरकार देऊ. हे सरकार राज्याच्या विकासाठी कटिबद्ध असेल,’ असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.