JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत थर्टी फर्स्टला रेव्ह आणि ड्रग्स पार्ट्या करताय, तर सावधान!

मुंबईत थर्टी फर्स्टला रेव्ह आणि ड्रग्स पार्ट्या करताय, तर सावधान!

नववर्षाचा स्वागत म्हटलं की पार्ट्या, हंगामा आणि जल्लोष.. मात्र, पार्ट्यांच्या नावाखाली नववर्षात मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आणि रेव्ह पार्ट्यांचं आयोजन केलं जातं असल्याची बाबसमोर आली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सत्यम सिंग, प्रतिनिधी मुंबई, 25 डिसेंबर :  नववर्षाचा स्वागत म्हटलं की पार्ट्या, हंगामा आणि जल्लोष.. मात्र, पार्ट्यांच्या नावाखाली नववर्षात मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आणि रेव्ह पार्ट्यांचं आयोजन केलं जातंय. मात्र, यंदाही एकीकडे ड्रग्स पार्ट्याची तयारी सुरू असल्याचा म्हटलं जात आहे तर दुसरीकडे ड्रग्ज  किंवा रेव्ह पार्ट्यां होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. मुंबई हे ड्रग्स रॅकेटचा प्रमुख हब समजलं जाते. इथं ड्रग माफियांचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. ड्रग्स हे अफगाणिस्तान सारख्या इतर अनेक देशातून भारतात आणले जाते. भारतात आणल्यानंतर हे ड्रग्स काश्मीरपासून दिल्ली आणि नंतर मुंबईमध्ये आणली जाते. या ड्रग्जची वाहतूक रोड मार्गे, विमान वाहतूक आणि प्रामुख्याने रेल्वेमार्फत केली जाते. पण यंदा थर्टी फर्स्ट आणि नववर्षवर ड्रग माफियांवर करडी नजर रेल्वे पोलिसांची आहे, अशी माहिती अँटी अमलीपदार्थ विरोधी पथकाचे पोलीस आयुक्त शिवदीप लांडे यांनी दिली. तसंच ड्रग्स संदर्भात कोणतीही तक्रार करायची असेल तर  9819111222 या क्रमाकांवर संपर्क करावा, असं आवाहनही लांडे यांनी केलं. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्स विक्रीचे रॅकेट आहेत. त्याचबरोबर थर्टी फर्स्ट किंवा नववर्षाला ड्रग्स किंवा रेव्ह पार्ट्यांचं आयोजन मुंबईच्या अनेक थ्री स्टार, फाईव्ह स्टार पब, हॉटेलमध्ये केलं जातंय तर ठाणे जिल्ह्यात येयूर, लोणावळा सारख्या भागात ही अशा पार्ट्या मोठ्या प्रमाणावर होतात हे उघडकीस आलं आहे. म्हणूनच यंदा मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. थर्टी फर्स्टच्या दिवशी नार्कोटिक्स सेल, क्राईम ब्रांचसोबत पोलीस अधिकारी कर्मचारी हे साध्या वेशात ड्रग्स आणि रेव्ह पार्ट्यांवर लक्ष ठेऊन राहणार आहेत. 2019 मध्ये मुंबई पोलिसांनी ड्रग्सवर एकूण कारवाया एकूण केसेस - 11572 एकूण अटक - 11986 एकूण प्रमाण - 714 किलो किंमत -62 कोटी रूपये 2019 मध्ये अँटी नारकोटिक्सने केलेली कारवाई एकूण केसेस - 70 एकूण अटक - 103 एकूण प्रमाण - 394 किलो किंमत- 25 कोटी याआधीच्या तपासात असं ही समोर आलं आहे की, हे ड्रग्स पॅडलर किंवा मॅन्युफॅक्चरर नेट बँकिंगच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणावर पैशाची देवाणघेवाण काश्मीरला करतात. मात्र, जरी हे ड्रग्ज मॅन्युफेक्चरर किंवा पॅडलर काही प्रमाणात आनलाईन ट्रॉन्झेक्शन करत असले. तरी ड्रग्सचा वापर करणाऱ्यांकडे चलन संकट असल्यामुळे यंदा मात्र ड्रग्स किंवा रेव्ह पार्ट्यांच्या धंदा हा मंदा असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे. थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या निमिताने ड्रग्ज पार्ट्या होणार अशी दाट शक्यता आङे. काश्मीर ते मुंबईपर्यंत चालणारा हा ड्रॅग्स रॅकेटमध्ये कोटींची उलाढाल होते. त्यात मॅन्युफेक्चरर , कॅरिअर, एजेंट किंवा इतर लोकांची एक मोठी साखळी असते. स्थानिक आणि  शासकीय यंत्रणाचा ही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, तरुण पिढीला ड्रग्ज आणि रेव्ह पार्ट्यापासून वाचवण्यासाठी त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या