JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावर दिवाळी आधी मिळणार गोड बातमी, ऊर्जामंत्र्यांनी दिले संकेत

वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावर दिवाळी आधी मिळणार गोड बातमी, ऊर्जामंत्र्यांनी दिले संकेत

बिल संदर्भात मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, वित्त विभागात फाईल गेली आहे, अर्थमंत्री अजित पवार कोरोना झाला त्यामुळे ते आले की निर्णय होईल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 02 नोव्हेंबर: राज्यातील ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलाचे (Increased electricity bill) चटके अजुनही ग्राहकांना बसत आहेत. त्यावरून राज्यात वादळही निर्माण झालं होतं. आता या प्रश्नावर लवकरच दिलासा मिळेल असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin raut) यांनी दिले आहेत. दिवाळी आधी निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, वाढीव वीज बिल संदर्भात मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, वित्त विभागात फाईल गेली आहे, अर्थमंत्री अजित पवार कोरोना झाला त्यामुळे ते आले की निर्णय होईल. पण दिवाळी आधी लोकांना दिलासा मिळेल असे संकेतही राऊत यांनी दिले. लॉकडाउनच्या काळात लोकांना वीजेची अव्वाच्या सव्वा बीलं आली होती. त्यावरून असंख्य तक्रारी केल्या गेल्या. राजकीय पक्षांनीही आवाज उठवला होता. ऊर्जामंत्री म्हणाले, 12 ऑक्टोबरला मुंबई अंधारात गेली, त्याची नेमकी कारणे काय याविषयी माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. या आधी कळवा, आणि आता टाटा पॉवर प्लान्ट आणि मंगळवारी अदानी वीज कंपनी येथे जाणार आहे. भविष्यात मुंबईत वीज जाता कामा नये यासाठी आढावा घेतला जात आहे टाटा वीज दोन संच बंद आहे ते लवकर कसे सुरू करून योग्य दरात वीज कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वीज वितरण व्यवस्था 10 हजार मेगावॅट मुंबईसाठी तयारी असते तरी ही वीज कशी गेली याची माहिती घेतली जात आहे. ‘दोन ‘राजे’ खासदार असलेल्या पक्षाचा मी अध्यक्ष’ चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा वीज नेमकी काय गेली यासंदर्भात तीन रिपोर्ट या महिन्यात येतील, त्यानंतर एमईआरसी समोर ते रिपोर्ट मांडले जातील. सायबर हल्ला होता का या संदर्भात शंका उपस्थितीत केली होती पण तांत्रिक रिपोर्टमध्ये याबाबत नेमके काय भाष्य होते हे पाहवे लागेल असंही राऊत यांनी सांगितलं. मुंबई आता वीज जाणार नाही याची खात्री आता देतो पण पुढील काळात मुंबई यासाठी वीज उत्पादन वाढवावे लागेल  खासकरून जास्त उपयोग होणार असलेल्या काळात वीज वाढवली जावी ही भूमिका आहे. भारतात मृत्यू दर कमी होतोय हा दिलासा पण…तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता मुंबईसाठी 3500 मेगावॅट अजून वीज लागेल, ती वीज कशी निर्मिती करता येते ह्यासाठी कंपन्या समवेत चर्चा सुरू असल्याची माहितीही नितीन राऊत यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या