JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ...तर 'त्या' शहरांमध्ये लॉकडाउन लागू करावा लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

...तर 'त्या' शहरांमध्ये लॉकडाउन लागू करावा लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

लॉकडाउनबद्दल काही शहरं विचारणा करत आहे. पण लॉकडाउन करण्याचा निर्णय हा तुमच्यावर सोपवणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जून : ‘राज्यावर कोरोनाचे संकट हे दूर झाले नाही. आपल्याला कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे. पण कोरोनाला स्वत:हून बळी पडू नका’ असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढवण्यात येणार नाही, असं स्पष्ट केले आहे. परंतु, ज्या भागात कोरोनाची परिस्थितीत हाताबाहेर जाईल, अशा भागात लॉकडाउन लागू करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी लोकांना प्लाझमा दान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे - ३० तारखेपर्यंत हा लॉकडाउन आहे. ३० जूननंतर काय होणार आहे. लॉकडाउन हा शब्द आता बाजूला ठेवायचा आहे. - ३० जूननंतर लॉकडाउन उठणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे. त्याचे उत्तर नाही. - हळूहळू सर्व दुकानं सुरू करण्यात आली आहे. पण धोका अजून टळलेला नाही. आपण अनलॉकची सुरूवात केली आहे पण धोका अजूनही कायम आहे. - दुकानं उघडली म्हणून गाफील राहू नका, कोरोना आ वासून उभा आहे. तुम्ही जर घराबाहेर पडला तर कोरोनाचा धोका हा कायम आहे. - काही ठिकाणी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती, ती सुरू करण्यात आली आहे. बाजारपेठा, उद्योग धंदे सुरू करण्यात आले आहे. - आपला शेतकरी अहोरात्र अफाट मेहनत करत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून बोगस बियाण्याच्या तक्रारी आल्या आहे. यांची गंभीर दखल घेतली आहे. जे बियाणे पेरले ते उगवलेच नाही. दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पण पैसे येणार कुठून

- कर्जमुक्ती थांबली होती. त्यानंतर लॉकडाउन लागू झाला त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी पुढे लांबली होती. आता परत कर्जमाफीचा उरलेला टप्पा पुन्हा पुरवला जाणार आहे. - ज्या कंपन्यांनी बोगस बियाणे वाटले, त्या कंपन्या दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. ज्यांनी शेतकऱ्यांनी फसवलं त्यांच्यावर कडक कारवाई करणार - आपली आषाढी वारीची परंपरा आहे. आषाढी वारी आली आहे, मी पंढरपूरसाठी चाललो आहे. मी संपूर्ण या वारीचा व आपल्या विठू रायाला साकडं घालणार आहे, राज्यात काय परिस्थिती निर्माण झाले आहे. लाखो वारकरी आज घरात अडकले आहे. अनेक चित्रपटातून तुझे चमत्कार आम्ही पाहिले आहे. राज्यावरील कोरोना संकट दूर करण्यासाठी विठ्ठलाला साकडं घालणार आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी पाठीशी उभे राहावे. मुख्यमंत्री म्हणून मान वेगळा आहे पण मी मुख्यमंत्री म्हणून नाहीतर तुमचा प्रतिनिधी म्हणून जात आहे. - दहीहंडी मंडळांनी स्वत:हुन थर न लावण्याचा निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे. याला सामाजिक जाणीव म्हटले जाते. - गणेशोत्सव मंडळांची बैठक घेतली, त्यांनी एकसुरात सांगितलं की, सरकार जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. त्यामुळे यंदा सामाजिक भान ठेवून गणेशोत्सव साजरा होणार आहे. - अनेक ठिकाणी गणेशची मूर्तीही मोठी असते. त्यामुळे चार फुटांची मूर्ती असावी असा सल्ला मी दिला आहे. त्यामुळे जास्त लोकांची गर्दी जमणार नाही. लोकमान्य टिळकांनी जी चळवळ सुरू केली होती, त्याचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. - प्लाझमा थेरपी आपण मार्च एप्रिलपासून सुरुवात केली आहे. सुरुवातीला एकदोन ठिकाणी त्याचा वापर करत होतो. त्यातून सहा ते सात लोकं रुग्ण झाली आहे. त्यामुळे प्लाझमा थेरपीचा राज्यात आपण जास्त प्रमाणात वापर करणार आहोत. राज्यात महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. प्लाझमा थेरपीचे केंद्र आपण वाढवणार आहोत. जसे आपण रक्तदान करतो, तसे प्लाझमा दान करा. जी लोकं रुग्ण बरी होईल गेली आहे, त्यांनी आपला प्लाझमा दान करावा. त्यामुळे रक्तदान केले आहे, तसंच प्लाझमा दान करा. - कोरोनावरील आपण सगळीच औषध वापरत आहोत. केंद्राकडे औषध वापरण्यासाठी पाठपुरावा केला होता. सर्व औषधाचा पुरवठा राज्यात वाढवणार आहोत, किंमतीची चिंता करू नका, राज्य सरकार त्यासाठी आहे - आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळा जसा एक नवीन जीवन घेऊन येतो, पण काही संकटंही येतात. पाणी साचल्यामुळे डेंग्यूच्या अळ्या तयार होता. त्यामुळे कुठेही पाणी साचू देऊ नका. याबद्दल खबरदारी घ्या… - मी आपल्याला आपुलकीने सांगतो. आता सगळी दुकानं सुरू झाली म्हणून सगळं काही सुरू झालं असं समजू नका. आपणहुन कोरोनाला बळी पडू नका, एकमेकांपासून अंतर ठेवा. मॉर्निग वॉकसाठी परवानगी दिली आहे. - लॉकडाउनबद्दल काही शहरं विचारणा करत आहे. पण लॉकडाउन करण्याचा निर्णय हा तुमच्यावर सोपवणार आहे. त्यामुळे काही भागात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर त्या ठिकाणी लॉकडाऊन लागू करावा लागणार आहे. - ३० जूनला पंतप्रधान अन्नधान्य योजना संपत आहे. भगवे रेशन कार्ड आणि ज्यांच्याकडे  रेशन कार्ड नाही, त्यांना  धान्य वाटप केले जात आहे. ही मुदत 3 महिने वाढवण्यासाठी मुदत द्यावी अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. - आपण फक्त कोरोना एके कोरोना करत बसलो नाही. आता राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शाळा सुरू झाल्या आहे, त्यापेक्षा शिक्षण सुरू झाले पाहिजे - हे युद्ध अंतिम टप्प्यात आलं आहे, अजूनही संकट टळलं नाही. जे जे करण्यासारखं आहे.  लॉकडाउन पुन्हा लागू करण्याची गरज पडणार नाही, अशी अपेक्षा आपल्याकडून करतो. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या