JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / उद्धव ठाकरेंसाठी ‘तो’ शब्द वापरल्याने शिंदे गट चिडला; किरीट सोमय्यांची फडणवीसांकडे तक्रार

उद्धव ठाकरेंसाठी ‘तो’ शब्द वापरल्याने शिंदे गट चिडला; किरीट सोमय्यांची फडणवीसांकडे तक्रार

सोमय्यांना आवर घाला, असं फडणवीसांना कळविण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जुलै : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (BJP leader and former MP Kirit Somaiya) यांनी आज पूत्र नील सोमय्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. यावेळी त्यांनी अशी काही कॅप्शन दिली ज्यामुळे एकनाथ शिंदे गटाने आक्षेप नोंदवला आहे. या ट्विटनंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंसाठी असा शब्द वापरणे चुकीचं असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. किरीट सोमय्यांकडून स्पष्टीकरण… शिंदे गटाने यावर आक्षेप नोंदवल्यानंतर किरीट सोमय्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी मला आणि माझ्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. याशिवाय नवनीत राणांनाही तुरुंगात टाकले होते. त्यामुळे मी त्यांना माफिया म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

या सर्व प्रकरणात केसरकर म्हणाले की, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतू तो होऊ शकला नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांना आक्षेप कळवण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करायची नाही, असं ठरविले आहे. त्यामुळे सोमय्यांना आवर घाला, असं फडणवीसांना कळविण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या