शुक्रवारी दिवसभरात 1,145 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 2,56,507 एवढी झाली आहे.
मुंबई 25 ऑगस्ट: राज्यात मंगळवारी 10 हजार 425 रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या कोविड रुग्णांचा एकूण आकडा 7 लाखांच्यावर गेला आहे. 7 लाख 3 हजार 833 जण कोरोना बाधित असल्याची माहिती देण्यात आलीय. राज्यात एकूण 5 लाख 14 हजार 790 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 329 जणांचा मृत्यू झाला. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 73.14 वर गेलं आहे. राज्यात 1 लाख 65 हजार 921 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास बेजबाबदार, काळजी न घेणारे आणि मास्क न घालणारे लोकच जबाबदार आहेत असा इशारा ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिला आहे. भारतातल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी देत त्यांनी देशातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं स्पष्ट केलं. भारतातील 0.29 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 1.92 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये तर 2.7 टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आलेला आहे. हॉस्पिटलच्या ICUमध्ये लागली आग, 9 रुग्णांना खिडकी तोडून काढलं बाहेर; पाहा VIDEO मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 69 टक्के पुरुष आहेत तर 31 टक्के महिला आहेत. तर मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 50 टक्के रुग्ण हे 60 वर्षांच्या वरच्या वयोगटाचे आहेत. 30 जाने: दररोज फक्त 10 चाचण्या होत होत्या. 15 मार्चला हे प्रमाण दररोज 1000 चाचण्या. 15 मे रोजी दररोज 95000 चाचण्या. तर 12 ऑगस्टला 10 लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला गेला. ‘पवारांनी पुढाकार घेतला असता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असता’ काही दिवस भारतात अमेरिका आणि इतर सर्व देशांपेक्षा जास्त चाचण्या केल्या गेल्या आहेत अशी माहितीही बलराम भार्गव यांनी दिली.