JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BASE Jumping : हवेत तरंगणारा मुंबईकर तुम्हाला माहिती आहे? पाहा Video

BASE Jumping : हवेत तरंगणारा मुंबईकर तुम्हाला माहिती आहे? पाहा Video

टी. व्ही ऍड्समध्ये अगदी सहजपद्धतीनं उंचावरुन उडी मारताना एखाद्या व्यक्तीला पाहतो. ते पाहून मनात अनेक प्रश्न डोकावतात. हा प्रकार खरोखर करणारा एक मुंबईकर आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 डिसेंबर : आपण अनेकदा टी. व्ही ऍड्समध्ये  अगदी सहजपद्धतीनं उंचावरुन उडी मारताना एखाद्या व्यक्तीला पाहतो. ते पाहून मनात अनेक प्रश्न डोकावतात. आपल्याला कधी कधी वाटतं की हे सगळं सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एडिट केलेलं असेल. पण, अनेकदा ते एडिट केलेलं नसून खऱ्याखुऱ्या पद्धतीने ती उडी मारलेली असते. उंचावरुन उडी मारल्यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरले जाते. त्यालाच बेस जम्पिंग म्हणतात. मुंबईत राहणारे साजिद चौगुले यांनी या पद्धतीनं अनेकदा बेस जम्पिंग केले आहे. कुठे केलं जम्पिंग? साजिद चौगुले यांनी अमेरिकेत राहत असताना मित्रांसोबत बेस जम्पिंगचे ट्रेनिंग घेतले आणि बेस जम्पिंग करायला सुरुवात केली. बेस जम्पिंगमधील बारकावे त्यांनी लक्षात घेतले आणि भारतात परतल्यावरही अनेक ठिकाणांवरुन त्यांनी जम्पिंग केलं आहे. कोकण कडा, विदेशातील अनेक उंच कडे, पवनचक्की, उंच इमारती यावरून त्यांनी बेस जम्पिंग केलं आहे. संपूर्ण भारतात बोटावर मोजण्याईतकेच बेस जम्पर असून त्यामध्ये साजिद यांचा समावेश आहे. बेस जम्पिंग म्हणजे काय? बेस जम्पिंग हा साहसी व एरोस्पोर्टचा प्रकार आहे. बेस जम्पिंगसाठी आधी स्काय डायव्हर होणं महत्वाचं असतं. BASE हा एक फुलफॉर्म आहे. बी म्हणजे बिल्डिंग, ए म्हणजे अँटीना, S - स्पॅन म्हणजे ब्रिज, ई - अर्थ, जमीन, डोंगर. या ठिकाणाचा भौगोलिक अभ्यास करून एक जागा निश्चित केली जाते व तेथून उडी घेऊन जमिनीवर उतरलं जातं. तारेवरची कसरत करणारा मराठी तरूण, Video पाहून चुकेल काळजाचा ठोका! काय असतं आव्हान? बेस जम्पिंग करताना  बॉडी स्थिर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एकाग्रताही महत्वाची असते. कारण, उडी घेतल्यानंतर उंचीचा अंदाज घेऊन पॅराशूट वेळीच उघडण अत्यंत महत्वाचं असतं.  स्कायडायव्हिंग करताना दोन पॅराशूट सोबत असतात मात्र बेस जम्पिंग मध्ये एकच पॅराशूट असतो.  हवेचा अंदाज घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं कारण हवा चूकीच्या दिशेला असल्यास जमिनीवर उतरणं कठीण होतं. भौगोलिक गणितं जुळवून बेस जम्पिंग केलं जातं. यासाठी प्रशिक्षण घेणं अनिवार्य आहे. Video : हॉलिवूड थक्क होईल असे स्टंट करणारा मराठी तरूण, सैन्यालाही करतो मदत ‘बेस जम्पिंग करण्याआधी 200 ते 300 वेळा स्काय डायव्हिंग करणं गरजेचं असतं कारण पॅराशूट हाताळता यायला हवं. अनेक साहसी खेळ भारतामध्ये फारसे माहिती नाहीत. त्यामुळे त्या खेळाबद्दल लोकांमध्ये भीती आणि गैरसमज आहेत. प्रत्येक गोष्ट काळजीने खेळल्यास त्यात मजा येते. मी माझ्या आनंदासाठी बेस जम्पिंग करतो,’ असं साजिद चौगुले यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या