मुंबई, 11 फेब्रुवारी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh)हे मुंबईतून (Mumbai) एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी निघाले असता राज्य सरकारचे विमानच उपलब्ध करून न दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह आह. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये या ना त्या मुद्यावरून वाद पाहिले आहे. पण, आज मुंबई विमानतळावर राज्यपालांना राज्य शासनाचे विमान उपलब्ध करू दिले गेले नाही. राज्यपाल आज सकाळी 10 वाजता मसुरी येथे नवनियुक्त आयएएस अधिकारी 122 बॅच कार्यक्रम यासाठी जाणार होते. मुंबईतून ते प्रथम राज्य शासनाच्या चार्टर विमानाने देहराडून येथे जाणार होते. त्यासाठी ते विमानतळावर गेल्यावर उड्डाण घेण्याचे परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यपाल यांनी चार्टर विमानाऐवजी रेग्युलर फ्लाईटने देहरादून येथे गेले. राज्य शासनाने चार्टर फ्लाईट पूर्व नियोजित उपलब्ध करून द्यावे, असे राजभवनाकडून सांगण्यात आले होते. ते उपलब्ध का करून दिले गेले नाही याची माहिती तुर्तास उपलब्ध झालेली नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून वाद दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदाराचा मुद्या अजूनही प्रलंबित असल्यामुळे वाद पेटला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राज्यपालांवर निशाणा साधला होता. ‘महाविकास आघाडी सरकारने नियमानुसार 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार केली. ती यादी ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. पण महिने उलटले पण अजूनही राज्यपालांनी याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही. - राज्यपाल लवकरच नावं जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. ते आम्हाला कोर्टात जाऊ देणार नाही असं वाटतंय, असं सूचक विधान अजित पवार यांनी नाशिक येथील कार्यक्रमात केलं होतं. तर ‘12 आमदारांच्या मुद्यावर जो काही कायदेशीर निर्णय असेल, तो राज्यपाल घेतील. निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्यपालांचा आहे. त्यांचा निर्णय जर योग्य नसेल तर महाविकास आघाडी सरकारला जो काही निर्णय घ्यायचा आहे ते घेतील’ अस पलटवार भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसंच, ’ राज्यपाल हे राज्यघटनेनुसार राज्याचे प्रमुख असून ते मुख्यमंत्र्यांना नेमतात. राज्यपालाच्या नावाने मुख्यमंत्री काम करत असतात. अशा या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे मंत्री धमकीची भाषा वापरताl, हे कोणत्या संविधानात बसते? जी भाषा वापरता ती कोणत्या नीतिमत्तेत बसते, आधी सत्ताधाऱ्यांनी नीतिमत्ता शिकली पाहिजे मग राज्यपालांवर बोलले पाहिजे’ असा सणसणीत टोला फडणवीस यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.