JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai : डिजिटल करन्सीच्या युगातही 'इथं' आहे जुन्या नाण्यांचा खजिना!

Mumbai : डिजिटल करन्सीच्या युगातही 'इथं' आहे जुन्या नाण्यांचा खजिना!

डिजिटल करन्सीच्या काळात जुन्या नाण्यांविषयी जाणून घ्यायचं तर मग काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मुंबईत त्याचं उत्तर सापडेल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 डिसेंबर :  नाण्यांचा संग्रह करण्याची आवड बऱ्याच जणांना असते. सध्याच्या डिजिटल करन्सीच्या काळात जुन्या नाण्यांविषयी जाणून घ्यायचं तर मग काय करायचं? कुठे बघायची किंवा कुठे मिळतील ही नाणी, नोटा? असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येईल. तर आज फक्त भारतीय नाणी, नोटा नव्हे तर विदेशी नाणी, नोटा कुठे मिळतात हे पाहूयात. युसूफ सिद्दीकी यांचं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या भागात छोटंसं दुकान आहे. या दुकानात संपूर्ण जगातील देशांतील नाणी ते विकतात. युसूफ यांच्या वडिलांना नाणी व नोटा गोळा करण्याची आवड होती त्यामुळे त्यांनी गोळा केलेली नाणी व नोटा युसूफ यांनी विकायला सुरुवात केली. आता अनेक जण त्यांच्याकडे येऊन नाणी देतात. ज्यांना नाणी गोळा करण्याची आवडत आहे ते सुद्धा इथून नाणी नोटा विकत घेतात. काय आहे विशेष? युसूफ सिद्दीकी यांच्याकडे मुघलकालीन नाणी, शिवकालीन मोहरा, ब्रिटिशांची करंसी, काळानुसार भारतात बदलत गेलेली सर्व नाणी, नोटा, विदेशातील नाणी व नोटा विशेष म्हणजे विदेशातील इतक्या जुन्या नोटा असून सुद्धा त्या फाटत नाहीत, भिजत नाहीत. चांदी, तांबे, पितळ, तसेच इतर धातूपासून तयार झालेले नाणी इथे मिळतात.

स्वातंत्र्याचा 75 वा अमृत मोहोत्सव सुरु आहे त्यानिमित्ताने बजारपेठेत आणलेल्या नाण्यांचं विशेष संग्रह सुद्धा केला आहे. भारतातील शंभर रुपयांची सगळ्यात जूनी नोट सुद्धा त्यांच्याकडे आहे. 120 पेक्षा जास्त देशांची करंसी त्यांच्याकडे आहे. 10 रुपये ते 10 लाख इतक्या किमतीत विकली जाणारी नाणी युसुफ यांचेकडे मिळतात. माझ्या बाबांनी गोळा केलेली नाणी नोटा मी विकतोय. येथे बरेच लोकं येतात नाणी घ्यायला आणि विकायला. याची किंमत आम्ही कॅटलॉगला मॅच करून ठरवतो असं युसूफ सिद्दीकी म्हटले.   गाणी, सिनेमा रेकॉर्ड प्लेयवर ऐकायला आवडणाऱ्यांसाठी ‘इथं’ आहे खजिना, पाहा Video हे दुकान कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराष्ट्र टर्मीनल्स पासून 10 मिनिटं अंतरावर हे युसुफ यांचं हे दुकान आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या