मुंबई, 24 जून : एकीकडे कोरोनाचं संकट तर दुसरीकडे आर्थिक अडचण. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील नालासोपाऱ्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. येथील कुटुंबाकडे पैशाची कमतरता असल्यामुळे त्यांना टॅक्सीच्या टपावर तिरडी बांधून मृतदेह त्यावर ठेवून स्मशानभूमीत आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. हे वाचा- कोरोनामुळे परदेशात अडकली अभिनेत्री, तिला पाहायला चाहते करतात घरासमोर गर्दी! नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव येथे राहणाऱ्या 49 वर्षीय महिला रविवारी मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र या रुग्णवाहिकेने 2 किमीसाठी 3000 रुपये मागितले. आधीच आईच्या डायलिसिसवर खूप पैसे खर्च झाले होते. त्यामुळे हाताशी पुरेसे पैसे नव्हते. अशावेळेस कुटुंबीयांनी स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी चक्क टॅक्सीचा आधार घ्यावा लागला.
हे वाचा- राष्ट्रवादीचे नेते भाजप आमदार पडळकरांवर भडकले, फडणवीसांना विचारला थेट जाब दरम्यान मुंबईसह उपनगरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. कोरोना नियंत्रणात आणताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, मालाडमधील तब्बल 70 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता आहेत. त्यामुळे या रुग्णांना शोधण्याचं एक मोठं आव्हान महापालिकेसमोर उभं ठाकलं आहे. याबाबत महापालिकेने पोलिसांना एक पत्र पाठवून मदत मागितली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पी वार्डमधील हे सगळे रुग्ण आहेत. या रुग्णांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली आहे.