JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Thane to Dombivali : ठाणे ते डोंबिवली 30 किमीचा प्रवास आता फक्त 20 मिनिटांत, असा आहे मेगा प्लॅन

Thane to Dombivali : ठाणे ते डोंबिवली 30 किमीचा प्रवास आता फक्त 20 मिनिटांत, असा आहे मेगा प्लॅन

ठाणे आणि डोंबिवली या दरम्यानच्या प्रवासासावेळी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना तासनंतास वेळ काढावा लागते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 23 फेब्रुवारी : ठाणे आणि डोंबिवली या दरम्यानच्या प्रवासासावेळी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना तासनंतास वेळ काढावा लागते. दरम्यान ही वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. सध्या ठाणे ते डोंबिवली दरम्यान प्रवास सोपा होणार आहे.

मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी द्वारा चालू केलेले मोटागांव-माणकोली खाडी पूल 84 टक्के पूर्ण झाले आहे. यामुळे प्रवाशांना आता ठाणे ते डोंबिवलीचा प्रवास फक्त 20 मिनिटांत होणार आहे.

दरम्यान या कामाला वेग आल्याने पुढच्या तीन महिन्यात म्हणजे मे 2023 पर्यंत हे काम होण्याची शक्यता आहे. मे महिन्यानंतर वाहतूक सेवा या मार्गावरून सुरळीत होणार आहे. या दरम्यान प्रवाशांना ठाण्यावरून डोंबिवलीला पोहचायला ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो.

संबंधित बातम्या

हे ही वाचा :  राज्याच्या राजकारणाला नवे वळण, आदित्य ठाकरेंचं फडणवीस यांच्याबद्दल मोठं विधान

मुंबई-नाशिक महामार्गावरून डोंबिवलीला जाण्यासाठी कल्याणमधून जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरडीएने सिक्स लेन माणकोली पूल आणि उल्हास खाडीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा :  भर समुद्रात थरारक घटना, कस्टमने पाठलाग करून बोट पकडली, तपासात बसला धक्का

माणकोली-मोटागाव लिंक रोड 1.3 किमी लांबीचा आहे. गेल्या काही वर्षांपासून एमएमआरडीए या प्रकल्पावर काम करत असून महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी मंगळवारी प्रकल्पाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या