JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू, राज्यपालांच्या भेटीत फडणवीसांकडून मोठी मागणी 

ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू, राज्यपालांच्या भेटीत फडणवीसांकडून मोठी मागणी 

आता उरले फक्त काही तास…

जाहिरात

फडणवीस यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर मुख्यमत्र्यांनी त्यांना मेसेज केला पण त्यात मजकूर काय हे मात्र कळू शकले नाही.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जून : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी दिल्ली येथे जे पी नड्डा आणि अमित शहा यांनी भेट घेतली. यानंतर काही वेळापूर्वी ते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर आल्याचं समोर आलं आहे. यावेळी भाजपकडून बहुमत चाचणीसाठी पत्र देणार असल्याचं समोर आलं आहे. फडणवीसांच्या दिल्लीवारीनंतर राजकिय घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांसोबत चर्चा केली आहे. 30 तारखेला ठाकरे सरकारची बहुमत चाचणी… सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे. याशिवाय बहुमत चाचणीची मागणी करण्यात आली आहे. बंडखोर आमदारांच्या याचिकेची प्रत राज्यपालांकडे देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. राज्यपालांनी 30 तारखेला सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे, अशीही चर्चा आहे. यावेळीच बहुमत चाचणी घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? राज्यपालांना आज इमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भाजपकडून पत्र दिलं आहे. आणि या पत्रात राज्याच्या आताच्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत. त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं, असं विनंती करणारं पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. यावर राज्यपाल उचित निर्णय घेतील. अशी आम्हाला अपेक्षा आहे. फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राज्यभवनावर दाखल दिल्लीहून परतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राज्यभवनावर दाखल झाले. त्यामुळे आता हे सत्तानाट्य फार काळ चालेल असं वाटत नाही. यापुढे कशी पावलं टाकायची किंवा दिल्लीवाल्यांचा काय निरोप आहे, यावर या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली होती. यावेळी फडणवीस यांच्यासोबत 5 आमदारही आहे. दुसरीकडे शिंदे गट 30 जूनपर्यंत मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर आणि आणखी दोन आमदार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या