मुंबई, 26 जून : पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी (Pandharpur Vithhal Rukmini) हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतुर झाले आहोत. दोन वर्षांनी पुन्हा आषाढी वारीला (Ashadhi Wari 2022) सुरुवात झाली आहे. वारकरी हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. याच आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काय आहे बातमी - यावर्षी 10 जुलैला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) आहे. त्यासाठी वारकऱ्यांनी पायी वारी सुरू केली असून पंढरपुरकडे मार्गक्रमण केले आहे. याच आषाढी वारीसाठी आता पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेने विशेष सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आता आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या (Special train for Ashadhi Ekadashi Padharpur) सुटणार आहेत. मध्य रेल्वेने पंढरपूरच्या आषाढी एकादशीसाठी विशेष रेल्वे सुरू सुरू केल्या आहेत. त्या 5 ते 14 जुलैदरम्यान चालवण्यात येणार आहेत. या रेल्वे नागपूर-सोलापूर-लातूर-अमरावती-मिरज-खामगाव ते पंढरपूर, मिरज-कुडूवाडी दरम्यान चालवल्या जातील. तसेच जादा फेऱ्यादेखील सोडल्या आहेत. यासाठी आरक्षण सुरू झाल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
हेही वाचा - VIDEO : आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; ‘अशी’ केली जातेय जय्यत तयारी आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरमधील (Pandharpur) लाखो वारकऱ्यांचे विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर येते. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो वारकरी (Warkari) पायी चालत पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) करतात. हा दिवस महाराष्ट्रत अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आषाढ महिण्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. यंदा आषाढी एकादशी 10 जुलै रोजी (Ashadi Ekadashi 2022 Date) आहे. या दिवशी आळंदी, देहू आणि पैठणसह अनेक ठिकाणांहून संत महंतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. या दिवशी ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते घरीच विठ्ठलाची पूजा (Ashadhi Ekadashi Vrat) करून उपवास करतात.