JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना नितेश राणेंचा तोल ढळला, अखेर शब्द घेतले मागे!

आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना नितेश राणेंचा तोल ढळला, अखेर शब्द घेतले मागे!

शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने भारतमाता सिनेमासमोर नितेश राणे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जुलै: पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Session) दोन दिवस भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला होता. दुसऱ्या दिवशी प्रतिविधानसभा भरवण्यात आली होती. यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती. आज युवासेनेनं आंदोलन केल्यानंतर नितेश राणेंनी दिलगिरी व्यक्त करत शब्द मागे घेतला. मंगळवारी विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या

आज सकाळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली होती. त्यानंतर  नितेश राणे यांनी ट्वीट करून   माघार घेतली आहे. ‘माझ्या विधानाबद्दल  कुणी दुखावले असल्यास माघार घेतो, असं नितेश राणे म्हणाले. दरम्यान , आमदार नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये भाजपकडून भरवण्यात आलेल्या प्रति विधानसभेत भाषण करत असताना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, हे ठाकरे यांचे वंशज आहेत का यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावा लागेल, असं आक्षेपार्ह विधान केलं होतं. याला उत्तर म्हणून आज शिवडी-लालबाग विधानसभा शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने भारतमाता सिनेमासमोर नितेश राणे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी नितेश राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. मात्र त्यापूर्वीच  पोलीसांनी हस्तक्षेप केल्यामुळे शिवसैनिक आणि पोलिस यांच्यात बाचाबाची झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या