JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / दारू गाळणाऱ्या हातांनी घडवलेली कला पाहून वाटेल आश्चर्य! सोलापूरच्या महिला SP नी करून दाखवलं!

दारू गाळणाऱ्या हातांनी घडवलेली कला पाहून वाटेल आश्चर्य! सोलापूरच्या महिला SP नी करून दाखवलं!

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हातभट्ट्यांवर अवैध दारू गाळणाऱ्या महिलांसाठी #OperationParivartan सुरू करून त्यांच्यासाठी जगण्याचा कायदेशीर मार्ग खुला केला. या ‘परिवर्तन’ ब्रँडअंतर्गत 836 महिला आणि पुरुषांच्या हाताला काम देण्यात आलं आहे.

019

या तांड्यांवरील महिलांनी साड्या, उशी कव्हर यांच्यावर #BanjaraArt केलं असून याच्या विक्रीसाठी सोलापुरातील पोलीस ग्राऊंडवर 18 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता प्रदर्शन ठेवण्यात आलं आहे. यामुळे त्यांच्या पुढील पिढीचं भविष्य सुधारण्यास मदत होणार आहे.

जाहिरात
029

तेजस्वी सातपुते यांनी ऑक्‍टोबर 2020 मध्ये सोलापूर जिल्ह्याच्या एसपी म्हणून पदभार घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने अतिशय उत्तम काम केलं. स्वतः तेजस्वी सातपुते या कोरोनाबाधित झाल्या; मात्र 'वर्क फ्रॉम होम'द्वारे त्यांनी शासकीय सेवा सुरूच ठेवली.

जाहिरात
039

सोलापूर जिल्ह्यात काम करताना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या 'ऑपरेशन परिवर्तन'ने अनेकांना अवैध धंद्यांपासून दूर करून स्वतःच्या चांगल्या व्यवसायाकडे वळवले, याची राज्यभरात चर्चा आहे. विशेष करून हातभट्टी दारू गाळणाऱ्यांचे परिवर्तन झाले.

जाहिरात
049

दररोज अवैधपणे दोन लाख लिटर हातभट्टी दारूची विक्री होणाऱ्या जिल्हा आता हातभट्टी दारू मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. अवैध व्यवसाय करून स्वतःला गुन्हेगारीची वाट धरलेल्यांची पुढची पिढी अंधकारात जाऊ द्यायची नाही, असा संकल्प पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केला.

जाहिरात
059

कला असूनही परिस्थितीमुळे हातभट्टी दारू घालणाऱ्या महिलांनी तो व्यवसाय सोडून आता नवीन परिवर्तन ब्रँड तयार केला आहे. कोरोनाला फाईट करतच पोलीस अधीक्षक तेजस्वी यांनी ऑपरेशन परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली त्यातून 336 जणांचा कायमचं परिवर्तन झालं.

जाहिरात
069

ऑपरेशन परिवर्तन ची ख्याती अल्पावधीतच लोकसभेपर्यंत पोहोचली गुन्हेगारांवर वचक बसत सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकी व सुसंवाद देखील महत्वाचा असतो हे या ऑपरेशनने दाखवून दिलं.

जाहिरात
079

200 महिलांना उमेद व बँकांकडून जवळपास पंधरा लाखांचा अर्थसहाय्य मिळवून देऊन त्यांना कच्चा माल उपलब्ध करून दिला यापासून महिलांनी विविध वस्तू तयार केल्या त्याची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनीही केली.

जाहिरात
089

मुळेगाव तांडा परिसरात एक मोठा हॉल उपलब्ध करून त्या ठिकाणी 41 महिलांना शिवणकाम दिलं शालेय विद्यार्थ्यांसह विविध प्रकारचे गणवेश त्यात ठिकाणी शिलाई होत आहेत.

जाहिरात
099

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आता प्राथमिक शाळांमधील मुलांचे गणवेश त्या ठिकाणी शिलाई व्हावेत, या दृष्टीने पोलीस अधीक्षक यांचे प्रयत्न सुरू आहेत. हातभट्टी दारूचा व्यवसाय सोडलेल्यांनी पुन्हा परत फिरून तो व्यवसाय करू नये, हा त्यामागील हेतू आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या