JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ...म्हणून गुवाहाटीला निघून आलो, उदय सामंत अखेर बोलले

...म्हणून गुवाहाटीला निघून आलो, उदय सामंत अखेर बोलले

असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये.

जाहिरात

असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, २८ जून : महाराष्ट्राच्य राजकारणात भूकंप घडवणारे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) गुवाहाटीमध्ये गेल्या सात दिवसांपासून मुक्कामी आहे. एक एक करून शिवसेनेचे आमदार आणि मंत्री गुवाहाटीमध्ये दाखल झाले. उदय सामंत (Uday Samant ) सुद्धा शिंदे गटात सामील झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. पण, आपण सध्या एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही.मी शिवसेनेतच आहे, असा खुलासा उदय सामंत यांनी केला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून शिवसेनाला मोठे भगदाड पाडले आहे. शिवसेनेचे ३८ आमदार आणि अपक्षांसह शिंदे गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. शिंदे गुवाहाटीमध्ये पोहोचल्यानंतर राज्यातून एक एक करून आमदार आणि मंत्री चुपचाप शिंदे गटात सामील झाले. उदय सामंत सुद्धा बऱ्याच दिवस राज्यातच होते. पण, दोन दिवसांपूर्वीच ते शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली. अखेर आज सामंत यांनी खुलासा केला. ‘मी आजही शिवसेनेतच आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे. ‘राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले.त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे,असं सावंत म्हणाले. असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये. एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही; गैरसमजाला बळी पडू नका, असं आवाहनही सामंत यांनी केलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. सध्या एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसेनेने बळी पडू नये, अशी विनंतीही सामंत यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या