JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ...म्हणून मुंबईत कोरोना बळावतोय; लोकलमधील मास्कचा जुगाड पाहून आनंद महिंद्रा वैतागले

...म्हणून मुंबईत कोरोना बळावतोय; लोकलमधील मास्कचा जुगाड पाहून आनंद महिंद्रा वैतागले

ऐरवी देशभरातील विविध जुगाड शेअर करुन कौतुक करणाऱ्या आनंद महिद्रांनी हा फोटो शेअर करुन तीव्र प्रतिक्रिया दिली

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उद्योगपती आनंद महिंद्रा (Industrialist Anand Mahindra) सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. ते नेहमीच मजेशीर पोस्ट शेअर करीत असतात. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टची खासियत म्हणजे त्यांचे अधिकतर पोस्ट हे विविध प्रकारच्या जुगाडवर अवलंबून असतात. त्यांच्या पोस्टमधून अनेकदा भारतीयांमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या टॅलेंजचं कौतुकही केलं जातं. त्यामुळे देशातील कानाकोपऱ्यातील विविध जुगाड मग तो रिक्षा चालक असो व नोकरदार, या सर्वमान्यांच्या आयुष्यातील अनोख्या गोष्टी समोर येत असतात. सध्या आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेले फोटो तसा पाहता मजेशीर आहे. मात्र चिंता वाढवणारादेखील आहे. काही अंशी मुंबईत वाढणाऱ्या रुग्णसंख्येसाठी जबाबदार असल्याचंही म्हटलं जात आहे. या फोटोमध्ये मास्कच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या राज्य सरकारकडून मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम अधिक कडक केले आहेत. मात्र असे असतानाही लोकांमध्ये जागृकतेचा अभाव असल्याचे दिसते. या जुगाडमुळे आनंद महिंद्रा चिडले आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये एक मुलगा लोकलमध्ये झोपलेला दिसत आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी त्याने मास्क तर लावला आहे, मात्र तो नाक व तोंडावर नाही तर डोळ्यावर लावला आहे. आनंद महिंद्रांनी हा फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, जेव्हा तुम्ही मुंबईत कोरोना प्रकरण वाढत असल्याच्या कारणाचा शोध सुरू करता तेव्हा..(हा जुगाड कौतुकास पात्र नाही)

संबंधित बातम्या

हे ही वाचा- मुलं मोबाईलवर काय पाहतात? पालकांना ठेवता येणार लक्ष; YouTube चं नवं फीचर मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात दररोज 5000 हून अधिक प्रकरणं समोर आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना इशारा दिला आहे. जर येत्या काही दिवसात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या