(मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
मुंबई, 19 जून : ‘काल त्यांच्या पोटातलं ओठात आलं. तुम्हीच केलीत गद्दारी, सत्तेसाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तोडले. आमच्यावर आरोप करताय, पण तुम्हाला सहानुभूती मिळणार नाही. मतदारांशी द्रोह केला त्यांना सहानुभूती मिळणार नाही. त्यांच्याकडे असेल तोपर्यंत चांगले, जो गेला तो कचरा. एक दिवस तुमचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. याच रिक्षाने तुमच्या मर्सिडीजला खड्ड्यात घातलं, ही सर्वसामान्याची रिक्षा आहे, नादी लागू नका, ही आग आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन आज दणक्यात साजरा झाला. शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील गोरेगाव इथं नेस्को सेंटरमध्ये विराट असा सोहळा पार पडला. यावेळी शिंदेंनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ‘हा वर्धापन दिन आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा आहे. कालही ऐकलं, आजही ऐकलं, तेच टोमणे, तीच कॅसेट. त्यांना स्क्रीप्ट रायटर बदलायला सांगा. आम्ही आरोपांना उत्तर कामाने देणार. हेच बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं. हेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलं आहे. नेत्यांच्या रक्तातून घामातून शिवसेना मोठी झाली. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला यांना तुम्ही हिणवताय, याच लोकांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली. तुम्ही कुठे होतात, तुमच्यावर किती केस झाल्या? एकनाथ शिंदे शाखाप्रमुख मुख्यमंत्री झाला, याच्यामागे मेहनत, कष्ट रक्ताचं पाणी, बाळासाहेबांचे आशिर्वाद सोबत होते, त्यामुळे हे झालं. वयाच्या 21 व्या वर्षी कर्नाटकमध्ये 40 दिवस जेलमध्ये होतो. माझ्यासोबत असलेल्या लोकांनीही तेच भोगलंय, त्यामुळे शिवसेना मोठी झाली. घरावर तुळशीपत्र ठेवणाऱ्यांना हिणवणं योग्य नाही, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला. (Shivsena : एकापेक्षा एक अवली, तिंथं लवली कुणीच नाही, उद्धव ठाकरेंनी उडवली शिंदे गटाची खिल्ली) ‘वाघाचं कातडं पांघरून लांडगे निघाले म्हणतात, तुमची कोल्हेकुई कधीपर्यंत सुरू असते, जोपर्यंत वाघ डरकाळी फोडत नाही तोपर्यंत. वाघ जंगलात आला की दुम दबाके कुठे जातात. 20 जूनला जे केलं ते करायलाही वाघाचं काळीज लागतं. माझ्यात काही बदल झालेला नाही. काल कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता राहीन, असंही शिंदे म्हणाले. ‘काल त्यांच्या पोटातलं ओठात आलं. तुम्हीच केलीत गद्दारी, सत्तेसाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तोडले. आमच्यावर आरोप करताय, पण तुम्हाला सहानुभूती मिळणार नाही. मतदारांशी द्रोह केला त्यांना सहानुभूती मिळणार नाही. त्यांच्याकडे असेल तोपर्यंत चांगले, जो गेला तो कचरा. एक दिवस तुमचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही शिंदेंनी ठाकरेंवर केली. ‘शिवसेना धनुष्यबाण गहाण टाकला होता, तो सोडवण्याचं काम आम्ही केलं. मुख्यमंत्री कोण होते आणि सरकार कोण चालवत होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा, सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी चालवत होतं. निवडणूक आयोगाने आपल्याला धनुष्यबाण आणि शिवसेना दिलं आहे. सुप्रीम कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सरकार पडणार पडणार बोलत होते, काल बोलले नाहीत. पडणार नाही त्यांना माहिती झालं आहे. किती खोटारडेपणा करायचा. तुमच्या खोटारडेपणाला जनता साथ देणार नाही’ असा टोलाही शिंदेंनी ठाकरेंना लगावला. (Shirdi : कोल्हे गटाने काढला विधानसभेच्या पराभवाचा वचपा; विखे पाटलांना घरच्या मैदानावर मोठा धक्का) ‘मी दोन दिवस गावाला गेलो तर लगेच मुख्यमंत्री गावाला गेले. तुम्ही अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात गेले. घरी बसून सरकार चालवता येत नाही, त्यांना राज्यात काय चाललंय हे कळत नव्हतं. हे शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलं. तुम्ही आयुष्यभर जे पेरलं तेच उगवतंय. बाळासाहेबांनी पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली नव्हती. तुम्ही आम्हाला घरगडी समजता? नोकर समजता? असा सवालही शिंदेंनी केला. ‘तुम्ही जिल्ह्यामध्ये प्रतिस्पर्धी उभा करत होतात, हे पक्षप्रमुखाचं काम नसतं. भांडण लावायची, मजा बघायची याचे अनुभव आम्हाला आहेत. मनोहर जोशींना भर व्यासपीठावरून तुम्ही कारस्थानं अपमान करून त्यांना घरी जायला लावायचा पाप तुम्ही केलं.असा कोणताही पक्षप्रमुख नसतो, अशी टीकाही शिंदेंनी केली. ‘ठाकरेंना असुरक्षितता वाटत होतं, त्यांना मास लिडर नको होता, त्यांना दरबारी राजकारण पाहिजे होतं. चांगलं भाषण करायला लागला की त्याचं भाषण कट. एवढे लोक जातायत त्याचं आत्मपरिक्षण करा, का एवढी इनसिक्युरीटी. 50 खोके 50 खोके, लाखो लोकं आले, एवढे खोके कुठून येतील? त्यांना खोके माहिती आहेत, एक दिवस जनतेसमोर खोके आल्याशिवाय राहणार नाही. सगळं बाहेर येईल, असा इशाराही शिंदेंनी केली.