JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / eknath shinde : एकनाथ शिंदे दुपारी टाकणार 'बॉम्ब', पत्रकार परिषदेत मांडणार बाजू!

eknath shinde : एकनाथ शिंदे दुपारी टाकणार 'बॉम्ब', पत्रकार परिषदेत मांडणार बाजू!

एकनाथ शिंदे थेट गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 11 शिवसेनेचे आमदार आहे.

जाहिरात

एकनाथ शिंदे थेट गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 11 शिवसेनेचे आमदार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली एकनाथ शिंदे (eknath shinde in surat) आपल्या आमदारांसोबत आहे. आता दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला असला तरी आमदार फुटले. त्यामुळे शिवसेनेमध्ये रात्रभर जोरबैठका सुरू होत्या. त्यानंतर अचानक एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समोर आले. त्यानंतर एकनाथ शिंदे थेट गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 11 शिवसेनेचे आमदार आहे. धक्कादायक म्हणजे, विधान परिषदेत मतदान सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी आमदारांची जुळवाजुळव  सुरू केली होती. सर्व आमदारांना शिंदेंनी फोन केला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचं समोर आलं आहे. सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचंही समोर आलं आहे. विधान परिषद निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचं संख्याबळ हे 134 झालं आहे. त्यामुळे भाजप आता अविश्वास ठराव मांडले अशी चर्चा रंगली आहे. पण, त्यासाठी भाजपला आणखी संख्या जुळवावी लागणार आहे. पण, आता एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या