JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / "राणेंनी स्वत:ला महान समजणे बंद केले तर त्यांच्या आयुष्यातील समस्या औषधांशिवाय बऱ्या होतील" शिवसेनेची टीका

"राणेंनी स्वत:ला महान समजणे बंद केले तर त्यांच्या आयुष्यातील समस्या औषधांशिवाय बऱ्या होतील" शिवसेनेची टीका

Shiv Sena takes dig on Narayan Rane: शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून पुन्हा एकदा नारायण राणेंवर टीका केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑगस्ट : नारायण राणेंना (Narayan Rane) अटक झाल्यानंतर मंगळवारी रात्रीच जामीन सुद्धा मिळाला. यानंतर राणेंनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुद्धा कोर्टाने त्यांना दिलासा दिला. यानंतर राणेंनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं. राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर आता शिवसेनेने (Shiv Sena) सामनाच्या संपादकीयच्या (Saamana Editorial) माध्यमातून पुन्हा एकदा राणेंवर टीका केली आहे. पाहूयात सामनाच्या संपादकीयमधील महत्त्वाचे मुद्दे. भाजपने आता तरी शहाणे व्हावे गांजाची शेती कायद्याने बंद केली पाहिजे आणि त्याची सुरुवात केल्याबद्दल राज्यातील जनता ठाकरे सरकारला धन्यवाद देत आहे. फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर त्यांची नशा लवकरात लवकर उतरो हीच अटल चरणी प्रार्थना, दुसरे काय बोलायचे! कायद्येच राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारून पडण्याइतके सोपे नाही. हा महाराष्ट्र आहे, तरीही वर आमचे सरकार आहे! महाराष्ट्र केंद्राशी काय संघर्ष करणार? अशी मस्तवाल व महाराष्ट्रविरोधी भाषा राणे नावाचे केंद्रीय मंत्री वापरतात. महाराष्ट्राच्या अस्मितेची इतकी नाचक्की महाराष्ट्राच्या दुष्मनांनीही कधी केली नव्हती. राणे हे नॉर्मल मनुष्य नसल्यानेच त्यांनी राज्याला कमी लेखले. भाजपने आता तरी शहाणे व्हावे. Narayan Rane : फडणवीसांनी वक्तव्याला पाठिंबा दिला नाही, नारायण राणे म्हणाले… फडणवीसांकडून ही अपेक्षा नाही राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचे वक्तव्य केले ते आम्हाला मान्य नाही, पण राणेंवरील कारवाई योग्य नाही, हे विधान फडणवीस वगैरे लोक करतात ते कोणत्या आधारावर? अबलेवर एखाद्याने अत्याचार केला पण त्याच्या मनात तशी काही विकृत भावना नव्हतीच हो, तेव्हा आरोपीला निर्दोष सोडा व पुढचे गुन्हे करणअयासाठी मोकळीक द्या अशाच प्रकारचा हा युक्तिवाद आहे. काही काळ वकिली कऱणाऱ्या फडणवीसांकडून ही अपेक्षा नाही असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. राणे यांनी स्वत:ला महान समजणे बंद केले तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतील व त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल. मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते महान किंवा असामान्य झाले असतील तर त्यांच्या डोक्यातील हवा मोदीच काढतील हे पक्के असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या