JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / शिवसेनेच्या बैठकांना दांडी, तानाजी सावंतांच्या नाराजीची तुफान चर्चा, मविआला राज्यसभा निवडणुकीत फटका बसणार?

शिवसेनेच्या बैठकांना दांडी, तानाजी सावंतांच्या नाराजीची तुफान चर्चा, मविआला राज्यसभा निवडणुकीत फटका बसणार?

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना नेते तानाजी सावंत हे नाराज असल्याच्या चर्चां वारंवार समोर येत असतात. या चर्चांना खतपाणी घालणाऱ्या घटना पुन्हा घडल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जून : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून शिवसेना (Shiv Sena) नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे नाराज असल्याच्या चर्चां वारंवार समोर येत असतात. या चर्चांना खतपाणी घालणाऱ्या घटना पुन्हा घडल्या आहेत. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या नाराजीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय की काय? अशी सध्याची परिस्थिती आहे. राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व आमदारांची सोमवारी शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला तानाजी सावंत उपस्थित नव्हते. त्यानंतर मंगळवारी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीतही तानाजी नव्हते. तसेच शिवसेनेच्या आजच्या बैठकीतही तानाजी सावंत कुठेच दिसले नाहीत. विशेष म्हणजे स्वत: उद्धव ठाकरे हे यातील काही बैठकांना हजर होते. त्यामुळे तानाजी सावंत खरंच नाराज आहेत की काय? अशी चर्चा रंगली आहे. तानाजी सावंत यांच्या नाराजीच्या बातमींना काहिशी पार्श्वभूमी आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यांची नाराजी अद्यापही दूर झालेली नाही, अशी माहिती पुन्हा समोर आली. कारण शिवसेनेच्या गेल्या दोन ते तीन बैठकांमध्ये तानाजी सावंत है गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना प्रचंड उधाण आलं. दरम्यान, शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी तानाजी सावंत यांचं गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये गैरहजर राहण्यामागील कारण सांगितलं आहे. ( सलमान खानला धमकीच पत्र पाठवणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांच्या विशेष पथकाला मोठं यश ) “तानाजी सावंत हे गेल्या दोन-तीन बैठकांमध्ये हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होतेय. पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांना अपघातामुळे इजा असल्याने ते थेट सकाळी मतदानासाठी विधान भवनावर येणार आहेत”, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली. मविआत धुसफूसीच्या अनेकदा बातम्या, सावंताच्या नाराजीचा फटका बसणार? महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. कधी काँग्रेस नेते नाराज असल्याची बातमी येते तर कधी शिवसेना मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची बातमी समोर येते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात अनेकदा तणाव निर्माण होतात. पण नंतर तीनही पक्ष एकत्र येवून तोडगा काढतात. नंतर सर्वच पक्षांकडून हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार असा दावा केला जातो. तरीही तानाजी सावंत यांच्या नाराजीवरुन महाविकास आघाडीला फटका तर बसणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण तानाजी सावंत यांचं शिवसेना आणि महाविकास आघाडीला मत मिळालं नाही तर राज्यसभा निवडणुकीत मतांचं गणित बिघडू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या