'ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, तो विचार मोडू दिला जाणार नाही'
मुंबई, 23 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती साजरी केली जात आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली जात आहे. ‘विचारांशी नातं हे बाळासाहेबांशी खरं नातं आहे. जो जो विचारांशी नातं सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल’ असं म्हणत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अभिवादन करत देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
बाबासाहेबांनी नातं हे रक्तानं होत नाही, ते विचारांनी करावं लागतं. विचारांशी नातं हे बाळासाहेबांशी खरं नातं आहे. जो जो विचारांशी नातं सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल, असं म्हणत फडणवीस यांनी सेनेला टोला लगावला आहे. (‘ते आता फक्त शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख’, भाजपचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला) ‘ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, तो विचार मोडू दिला जाणार नाही’ असं म्हणत फडणवीस याांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्ताने निर्धार व्यक्त केला आहे. (…म्हणून त्यांना पोटशूळ उठला; बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून सत्तारांचा आदित्य ठाकरेंवर जोरदार पलटवार) विशेष म्हणजे, या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटीचा फोटो दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीसांचे फोटोही दाखवले आहे.