JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला, 10 जणच घेणार शपथ, नावं गुलदस्त्यात?

BREAKING : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला, 10 जणच घेणार शपथ, नावं गुलदस्त्यात?

या मंत्रिमंडळात भाजपला 29 कॅबिनेट मंत्रीही हवी आहे. तर शिंदे गटाला 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशी एकूण 13 मंत्रिपद हवी आहेत.

जाहिरात

या मंत्रिमंडळात भाजपला 29 कॅबिनेट मंत्रीही हवी आहे. तर शिंदे गटाला 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशी एकूण 13 मंत्रिपद हवी आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर येऊन 15 दिवस उलटले आहे, पण अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही मुहुर्त अजून सापडलेला नाही. पण, आता राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून 19 ते 21 जुलै दरम्यान, 10 मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी उरकला जाण्याची शक्यता आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर येऊन आता 15 दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे विरोधकांकडून टीका होत आहे. पण, फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये कुणा-कुणाला मंत्रिपद द्यायचे यावरून अजूनही एक वाक्यता आलेली नाही. शिवसेना बंडखोर आमदारांच्या नाराजीची भीती आणि भाजपमध्ये सुरू असलेली रस्सीखेच यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे. पण, आता होऊ घातलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये याचे पडसाद उमटण्याची चिन्ह आहे. त्यामुळे नाराज इच्छुकांचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाल्यानंतर 19 किंवा 21 जुलै रोजी ठराविक 10 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे, असं वृत्त दिव्य मराठीने दिले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 8 ते 10 मंत्र्यांच्या शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये शिंदे गट आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश असेल. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागच्या सरकारमधले 8 मंत्रीही सहभागी होते, त्यामुळे त्यांनाही नव्या मंत्रीमंडळात आपल्याला स्थान असेल अशी अपेक्षा आहे. या मंत्रिमंडळात भाजपला 29 कॅबिनेट मंत्रीही हवी आहे. तर शिंदे गटाला 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशी एकूण 13 मंत्रिपद हवी आहेत. शिंदे गटात आधीच शिवसेनेचे सात मंत्री आहे. शिंदे गटामध्ये 40 बंडखोर आमदार आणि 10 अपक्ष आहे, त्यामुळेच शिंदे गटाला जास्त मंत्रिपदं हवी आहेत. 6 आमदारांमागे एक मंत्रिपद अशी अट शिंदे गटाकडून घालण्यात आली असून एकूण 19 मंत्रिपद हवी अशी मागणी आहे. त्यामुळेच भाजपकडून याला होकार दिलेला नाही. एवढंच नाहीतर भाजपमध्येही चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळामध्ये नकोत आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विधानसभेचे उपाध्यक्षपद द्यावे, अशी फडणवीस यांची इच्छा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तार रखडलेला आहे. कोणत्या पक्षाला कोणती खाती? नव्या सरकारमध्ये गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपाकडे तर नगरविकास आणि महसूल ही खाती शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. अर्थ खातं सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादा भुसेंकडे पूर्वीचेच कृषी तर उदय सामंत यांना शिक्षण विभाग देण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दीपक केसरकर यांनाही चांगलं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना शिंदे सरकारमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत शंभुराज देसाई आणि अब्दुल सत्तार या राज्यमंत्र्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. किती मोठे मंत्रिमंडळ असेल ? 91व्या घटनादुरुस्तीमध्ये कलम 72 मध्ये 1A च्या नावाने एक नवीन कलम जोडण्यात आले, ज्यामध्ये मंत्रिमंडळाचा आकार आणि प्रकार स्पष्ट शब्दात स्पष्ट करण्यात आला आहे. तो केंद्रीय मंत्रिमंडळासाठी 72(1A) सुधारणा कायदा आहे तर राज्यांसाठी कलम 164(1) मध्ये स्पष्ट केला आहे. आता याच आधारावर राज्याचे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ठरवायची आहे. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 असल्याने त्यातील 15 टक्के म्हणजे 42. म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनते तेव्हा त्यात जास्तीत जास्त 42 जणांनाच मंत्री करता येते. यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. 28 नोव्हेंबर 2019 रोजी ठाकरे सरकारने शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत 31 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्री होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या